उन्हात वाळवलेले बटाट्याचे वेफर्स | Sun dried Potato Chips Recipe in Marathi

प्रेषक Rita Arora  |  6th Oct 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sun dried Potato Chips by Rita Arora at BetterButter
उन्हात वाळवलेले बटाट्याचे वेफर्स by Rita Arora
 • तयारी साठी वेळ

  24

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

300

0

उन्हात वाळवलेले बटाट्याचे वेफर्स recipe

उन्हात वाळवलेले बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sun dried Potato Chips Recipe in Marathi )

 • तुम्हाला हवे असतील तितके बटाटे घ्या
 • आवश्यकतेनुसार पाणी
 • मीठ स्वादानुसार
 • तळण्यासाठी तेल
 • आवश्यकतेनुसार काळे मीठ
 • शिंपडण्यासाठी लाल तिखट

उन्हात वाळवलेले बटाट्याचे वेफर्स | How to make Sun dried Potato Chips Recipe in Marathi

 1. बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. एका मोठ्या वाडग्यात पाणी घेऊन त्यात मीठ घालून बाजूला ठेवा. बटाटे सोलून ठेवा. किसणीच्या मदतीने बटाट्याचे काप करा. नंतर मीठ घातलेल्या पाण्यात काप घाला.
 2. काप अधिक जाड किंवा पातळ नसले पाहिजे. आपण मिठाच्या पाण्यात काप घातल्यामुळे ते काळे पडणार नाही.
 3. आता आणखी एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या आणि मीठ घाला. बटाटे पाण्यात बुडतील इतके पाणी घ्या. या मिठाच्या पाण्याला मोठ्या आचेवर उकळायला ठेवा. आता त्यात बटाट्याचे काप घाला. उकळत्या पाण्यात बटाट्याचे काप 2-3 मिनिटांसाठी उकळू द्या. 3 किंवा 4 मिनिटांनंतर आच मंद करू नका, गॅस बंद करा. काप अर्धपारदर्शक झाले की चाळणीत काढून गाळून घ्या.
 4. एका ट्रे किंवा ताटात स्वच्छ प्लास्टिक घाला आणि त्यावर व्यवस्थित रचून ठेवा. 1 किंवा 2 दिवस ते पूर्णपणे वाळेपर्यंत ठेवा. धूळ बसू नये म्हणून त्याला मलमली कापडाने झाकून ठेवा.
 5. ऊन नसेल, तर तुम्ही त्यांना सावलीत सुध्दा वाळवू शकतात, एक बाजूने वाळल्यानंतर दुसरी बाजू पलटा. थंड आणि कोरड्या जागी हवाबंद बरणीत भरून ठेवा.
 6. वाढताना:
 7. बटाट्याचे वेफर्स तेलावर परता किंवा तळा. स्वयंपाक घरातील टिश्यूवर काढून ठेवा. वाढण्याअगोदर त्यावर मीठ आणि लाल तिखट शिंपडा. गरमागरम बटाट्याचे वेफर्स वाढा.

Reviews for Sun dried Potato Chips Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo