झटपट एग फ्राईड राईस | Instant Egg Fried Rice Recipe in Marathi

प्रेषक Priya Mani  |  14th Oct 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Instant Egg Fried Rice by Priya Mani at BetterButter
झटपट एग फ्राईड राईस by Priya Mani
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

624

0

झटपट एग फ्राईड राईस recipe

झटपट एग फ्राईड राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Egg Fried Rice Recipe in Marathi )

 • बासमती तांदुळ - 2 कप
 • गाजर, बीन्स, मटार, सिमला मिरची, कोबी - 1 1/2 कप
 • पातीचा कांदा 2 पाती
 • 3 ते 4 अंडी ( चांगली फेटलेली )
 • चवीनुसार मीठ व पांढरी मिरी
 • चवीनुसार सोया सॉस
 • साखर 1 टी स्पून
 • अजिनोमोटो ( ऐच्छिक ) 1/2 टी स्पून
 • चवीनुसार चिली सॉस ( ऐच्छिक )
 • साली काढलेल्या 2 लसूण पाकळ्या
 • तेल 1 टी स्पून

झटपट एग फ्राईड राईस | How to make Instant Egg Fried Rice Recipe in Marathi

 1. तांदुळ शिजवून घ्यावा आणि थंड होऊ द्यावा . शिल्लक राहिलेला भात वापरणे चांगले.
 2. कढई किंवा पॅनमध्ये तेल टाकावे.
 3. चिरलेले आल्ले टाकून उच्च आचेवर परतून घ्यावे, त्यात पातीचा कांदा घालावा आणि छानपैकी परतून घ्यावा.
 4. सर्व भाज्या घालून उच्च आचेवर चटकन परतावे, मीठ व मिरी घालून चांगले मिसळून घ्यावे.
 5. आता सर्व भाज्या एका बाजूला कराव्यात, फेटलेली अंडी घालून शक्य तितकी नीट मिसळून घ्यावीत, नंतर त्यात भाज्या घालून चांगले मिसळून घ्यावे.
 6. आता भात घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.
 7. सोया सॉस व साखर घालून भाताला स्वादिष्ट बनवावे.
 8. प्रथम अजिनोमोटो व चिली सॉस घालावे, सगळे उच्च आचेवर परतावे.
 9. मिसळताना भाताचे तुकडे होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी.
 10. शेवटी पातीच्या कांद्याची पात घालावी आणि ते सगळे वाढण्याच्या बाऊलमध्ये घ्यावे .
 11. आणखी थोड्या पातीच्या कांद्याने सजवावे आणि कोणत्याही चायनीज मंच्युरीयन ग्रेव्ही बरोबर खायला द्यावे.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Instant Egg Fried Rice Recipe in Marathi (0)