हॉल व्हीट एगलेस चॉकोलेट केकची पाककृती | Whole Wheat Eggless Chocolate Cake Recipe Recipe in Marathi

प्रेषक Jolly Makkar  |  16th Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Whole Wheat Eggless Chocolate Cake Recipe by Jolly Makkar at BetterButter
हॉल व्हीट एगलेस चॉकोलेट केकची पाककृतीby Jolly Makkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1624

0

हॉल व्हीट एगलेस चॉकोलेट केकची पाककृती recipe

हॉल व्हीट एगलेस चॉकोलेट केकची पाककृती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Whole Wheat Eggless Chocolate Cake Recipe Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ - दीड वाटी
 • चांगल्यापैकी कोको पावडर - 1/4 वाटी
 • बेकिंग पावडर - 1 लहान चमचा
 • बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा - 3/4 लहान चमचा
 • मीठ - एक चिमुट
 • पिठी साखर - 1 वाटी
 • ताजा लिंबाचा रस - 1 मोठा चमचा
 • वनस्पती तेल - 1/3 कप
 • कोमट पाणी - 1 कप
 • चांगल्या गुणवत्तेचे व्हॅनिला इसेन्स किंवा पावडर - 1 लहान चमचा
 • गोड कोको पावडर - 1 मोठा चमचा शिंपडण्यासाठी

हॉल व्हीट एगलेस चॉकोलेट केकची पाककृती | How to make Whole Wheat Eggless Chocolate Cake Recipe Recipe in Marathi

 1. सुरु करण्याअगोदर, तुमचे ओव्हन 170 डिग्री सेंटीग्रेडवर प्री-हिट करा आणि एका केक टीनला समप्रमाणात त्या टीनच्या तळाशी आणि आतील उभ्या भागावर थोडेसे लोणी लावून ठेवा.
 2. त्यावर थोडे किंचित पीठ पसारा ज्यामुळे तुमचा केक जळणार नाही आणि सहजपणे निघेल.
 3. सर्व कोरडी सामग्री चाळून घ्या आणि व्यवस्थित मिसळा. तुम्ही द्रव मिश्रण फेटून घेईपर्यंत ते बाजूला ठेवा.
 4. एका स्वच्छ वाडग्यात कोमट पाणी, पिठी साखर, तेल आणि लिंबाचा रस घाला. व्यवस्थित हलवा, त्यात व्हॅनिला इसेन्स घाला आणि सर्व सामग्री व्यवस्थित मिसळली झाली आहे याची खात्री होईपर्यंत काही मिनिटांसाठी पुन्हा हलवा.
 5. आता हळूहळू आणि एकसारखे ते द्रव मिश्रण कोरड्या मिश्रणात थोडे थोडे करत मिसळा. गुठळ्या होऊ नयेत यासाठी हलवत रहा.
 6. लवकरच, एक गडद रंगाचे काहीसे भयानक असे जाड मिश्रण तुमच्यासमोर असेल. ते कितीही भयानक वाटत असले तरी देखील, अखेरीस त्यातून मिळणारा स्वादिष्टपणा पाहून तुम्ही चकित व्हाल.
 7. ते केकचे मिश्रण बनविलेल्या केक टीन मध्ये घाला. त्या टीनच्या बाजूंना टपली मारा जेणेकरून तिथून हवेचे बुडबुडे निघून जातील.
 8. ते केक आता 170 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 30 ते 35 मिनिटे बेक करा. एक टूथपिक घ्या, त्या केकमध्ये घालून पहा, जर ते बाहेर कोरडे निघाले तर तुमचा केक तयार झाला आहे आणि जर नसेल, तर तर आणखी काही मिनिटे तुम्ही त्यात ठेवू शकता.
 9. आता 5 मिनिटांसाठी ते त्या टीनमध्ये राहू द्या, नंतर हळुवारपणे कडेवर चाकू फिरवा आणि एका वायर रॅकवर तो केक परता. त्यावर गोड कोको पावडर शिंपडून खायला द्या.

My Tip:

हे काहीसे कोड्यात टाकणारे वाटू शकते, पण माझ्यावर विश्वास ठेवा हे सोपे आणि आरोग्यदायी देखील आहे... कारणे हे अंड्याशिवायचे आहे आणि ही लोणी नसलेली केकची पाककृती आहे.

Reviews for Whole Wheat Eggless Chocolate Cake Recipe Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo