चिकन 65 | Chicken 65 Recipe in Marathi

प्रेषक Sara Ibrahim  |  22nd Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chicken 65 by Sara Ibrahim at BetterButter
चिकन 65by Sara Ibrahim
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

269

0

चिकन 65 recipe

चिकन 65 बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chicken 65 Recipe in Marathi )

 • चिकन - 500 ग्रॅम्स
 • लाल मिरची पूड - 3 मोठे चमचे
 • हळद - 1 लहान चमचा
 • लिंबाचा रस - 1 मोठा चमचा
 • टोमॅटो पेस्ट - 1/3 कप
 • टोमॅटो कॅचप - 1/3 कप
 • दही - 2 मोठे चमचे
 • मीठ स्वादानुसार
 • हिरव्या मिरच्या - 2 किंवा 3
 • कडीपत्त्याची पाने - 10
 • चिमुटभर गरम मसाला
 • लोणी - 3 मोठे चमचे
 • एक चिमुट साखर

चिकन 65 | How to make Chicken 65 Recipe in Marathi

 1. चिकनला 3 मोठे चमचे लाल तिखट, 1 लहान चमचा हळद, थोडे मीठ आणि 1 मोठा चमचा लिंबाचा रस लावून ठेवा.
 2. स्थिर होण्यासाठी 30 मिनिटे ते 2 तास बाजूला ठेवा. सहसा चिकनला मऊ होण्यासाठी 45 मिनिटे (घाईत) लागतात. आता चिकन तळा.
 3. टोमॅटोचा रस्सा तयार करण्यासाठी टोमेटोची पेस्ट, कॅचप आणि दही यांना एकजीव करा.
 4. एक कढई घ्या आणि त्यात 3 मोठे चमचे लोणी घाला. कडीपत्ता आणि मिरच्या घाला दोन मिनिटे परता.
 5. टोमॅटोचा रस्सा घाला. आता 2 मिनिटे शिजू द्या.
 6. तळलेले चिकनचे तुकडे घाला. कढईवर झाकण ठेवा आणि मंद विस्तवावर 10 मिनिटे शिजू द्या.
 7. चिमुटभर गरम मसाला, साखर आणि मीठ घाला. झाकण लावा आणि मंद विस्तवावर पुन्हा 2 मिनिटे शिजू द्या.
 8. तुम्हाला ते पूर्णपणे कोरडे हवे आहे किंवा त्यात थोडाफार रस्सा हवा आहे हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे.

Reviews for Chicken 65 Recipe in Marathi (0)