जिलेबी | Jalebi Recipe in Marathi

प्रेषक Saranya Manickam  |  10th Dec 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Jalebi by Saranya Manickam at BetterButter
जिलेबी by Saranya Manickam
 • तयारी साठी वेळ

  2

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  1

  3 / 4तास
 • किती जणांसाठी

  105

  माणसांसाठी

396

0

जिलेबी recipe

जिलेबी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jalebi Recipe in Marathi )

 • उडीदडाळ अर्धा वाटी
 • साखर एक वाटी
 • पाणी अर्धा कप
 • लाल/केशरी खाद्यान्न रंग, चिमुटभर
 • रोज/गुलाबाचा इसेन्स 4 थेंब
 • वेलदोडे 1 लहान तुकडा
 • लिंबाचा रस 1 लहान चमचा
 • तळण्यासाठी तेल/तूप (मी रिफाईन्ड तेल वापरले होते)

जिलेबी | How to make Jalebi Recipe in Marathi

 1. उडीदडाळ 1 तास पाण्यात भिजवून ठेवा.
 2. त्यात पाणी न घालता ग्राईंडरमध्ये वाटून घ्या. गरज वाटल्यास किंचित पाणी शिंपडा. मिश्रण वाटून झाल्यानंतर ते फुगले पाहिजे.
 3. एका लहान प्रेशर कुकरमध्ये (3 लिटरच्या) साखर, 1/4 कप पाणी घाला आणि कुकर झाकून उच्च तापमानावर 7 शिट्या होईपर्यंत शिजवा.
 4. ताबडतोब दाब मोकळा करा आणि कुकर उघडा, यात सोललेले वेलदोडे, गुलाबाचा इसेन्स, लिंबाचा रस घाला आणि व्यवस्थित मिसळा. पुढील कृतीपर्यंत ते बाजूला ठेवा.
 5. एका मोठ्या वाटीत उडीदडाळीचे मिश्रण, खाद्यान्न रंग घ्या आणि व्यवस्थित मिसळा.
 6. एक जाड प्लास्टिक शीट घ्या आणि त्याला शंकूच्या आकारात दुमडा, त्याच्या तळाशी शेंगदाण्याच्या आकाराचे भोक करा आणि त्या शंकुत मिश्रण भरा.
 7. रुंद अशा एका कढईत तेल गरम करा आणि तेलावर किंचित मिश्रणाचे थेंब सोडा. ते मिश्रण पटकन वर आले म्हणजे जिलेबी तळण्यासाठी ती योग्य वेळ असेल.
 8. त्या गरम तेलात ते मिश्रण आवळून त्याची वर्तुळे बनवा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा (याला 2 मिनिटे लागू शकतात). तळून झाल्यावर ते तेलातून बाहेर कादा आणि पटकन साखरेच्या पाकात सोडा.
 9. पाकात 5 मिनिटे ठेवल्यानंतर त्यातून बाहेर काढा आणि ते दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात घाला. अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण तळा आणि पाकात बुडवून घ्या.
 10. बस्स झाले!!! गरमागरम किंवा थंड जिलब्यांचा स्वाद लुटा. गरम जिलब्या थोड्या कुरकुरीत असतात. 3 ते 4 तासानंतर ते मऊ होऊन जातात.

My Tip:

एकतारी पाकची सुसंगतता येण्याच्या ठीक अगोदरपर्यंत साखरेचा पाक उकळवून घ्या (कारण गॅसवरून उतरविल्यानंतर ते जाड होईल). खडे होण्याचे टाळण्यासाठी त्यात लिंबाचा रस मिसळा.

Reviews for Jalebi Recipe in Marathi (0)