Photo of Jalebi by Saranya Manickam at BetterButter
9281
130
5.0(0)
0

जिलेबी

Dec-10-2016
Saranya Manickam
120 मिनिटे
तयारीची वेळ
101 मिनिटे
कूक वेळ
105 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिलेबी कृती बद्दल

आपण असे समजतो की बहुतेक मिठाया बनविण्यास कठीण असतात, वास्तविक ते बनविण्यास अतिशय सोपे असतात. अशीच एक मिठाई म्हणजे जिलेबी आहे. मला जिलेबी त्याचा रसाळपणा, रंग आणि सुगंधी स्वाद यांच्यामुळे अतिशय आवडते, ती बनविण्यास देखील अतिशय सोपी असते आणि आपल्या सणाला अतिशय संपन्न बनविते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • तामिळ नाडू
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 105

  1. उडीदडाळ अर्धा वाटी
  2. साखर एक वाटी
  3. पाणी अर्धा कप
  4. लाल/केशरी खाद्यान्न रंग, चिमुटभर
  5. रोज/गुलाबाचा इसेन्स 4 थेंब
  6. वेलदोडे 1 लहान तुकडा
  7. लिंबाचा रस 1 लहान चमचा
  8. तळण्यासाठी तेल/तूप (मी रिफाईन्ड तेल वापरले होते)

सूचना

  1. उडीदडाळ 1 तास पाण्यात भिजवून ठेवा.
  2. त्यात पाणी न घालता ग्राईंडरमध्ये वाटून घ्या. गरज वाटल्यास किंचित पाणी शिंपडा. मिश्रण वाटून झाल्यानंतर ते फुगले पाहिजे.
  3. एका लहान प्रेशर कुकरमध्ये (3 लिटरच्या) साखर, 1/4 कप पाणी घाला आणि कुकर झाकून उच्च तापमानावर 7 शिट्या होईपर्यंत शिजवा.
  4. ताबडतोब दाब मोकळा करा आणि कुकर उघडा, यात सोललेले वेलदोडे, गुलाबाचा इसेन्स, लिंबाचा रस घाला आणि व्यवस्थित मिसळा. पुढील कृतीपर्यंत ते बाजूला ठेवा.
  5. एका मोठ्या वाटीत उडीदडाळीचे मिश्रण, खाद्यान्न रंग घ्या आणि व्यवस्थित मिसळा.
  6. एक जाड प्लास्टिक शीट घ्या आणि त्याला शंकूच्या आकारात दुमडा, त्याच्या तळाशी शेंगदाण्याच्या आकाराचे भोक करा आणि त्या शंकुत मिश्रण भरा.
  7. रुंद अशा एका कढईत तेल गरम करा आणि तेलावर किंचित मिश्रणाचे थेंब सोडा. ते मिश्रण पटकन वर आले म्हणजे जिलेबी तळण्यासाठी ती योग्य वेळ असेल.
  8. त्या गरम तेलात ते मिश्रण आवळून त्याची वर्तुळे बनवा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा (याला 2 मिनिटे लागू शकतात). तळून झाल्यावर ते तेलातून बाहेर कादा आणि पटकन साखरेच्या पाकात सोडा.
  9. पाकात 5 मिनिटे ठेवल्यानंतर त्यातून बाहेर काढा आणि ते दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात घाला. अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण तळा आणि पाकात बुडवून घ्या.
  10. बस्स झाले!!! गरमागरम किंवा थंड जिलब्यांचा स्वाद लुटा. गरम जिलब्या थोड्या कुरकुरीत असतात. 3 ते 4 तासानंतर ते मऊ होऊन जातात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर