मुगाच्या डाळीची खस्ता कचोरी | Moong daal ki khasta kachori Recipe in Marathi

प्रेषक Anjana Chaturvedi  |  26th Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Moong daal ki khasta kachori by Anjana Chaturvedi at BetterButter
मुगाच्या डाळीची खस्ता कचोरी by Anjana Chaturvedi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

6452

0

मुगाच्या डाळीची खस्ता कचोरी

मुगाच्या डाळीची खस्ता कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong daal ki khasta kachori Recipe in Marathi )

 • मुगाची डाळ - 3/4 वाटी
 • स्वयंपाकाचे तेल - 2 मोठे चमचे
 • चिरलेल्या हिरव्या मिरच्या - दीड चमचा
 • चिरलेली पुदिन्याची पाने - 2 मोठे चमचे
 • चिरलेली कोथिंबीर - 2 मोठे चमचे
 • बडीशेप - अडीच लहान चमचे
 • धणेपूड - 2 लहान चमचे
 • जिरे - 1 लहान चमचा
 • हिंग - अर्धा लहान चमचा
 • लाल तिखट - अडीच लहान चमचे
 • गरम मसाला - 1 लहान चमचा
 • कैरीचा पावडर - 2 लहान चमचे
 • किसलेल आले - 2 लहान चमचे
 • पीठ मळण्यासाठी -
 • मैदा - 350 ग्रॅम्स
 • स्वयंपाकाचे तेल - अर्धा कप
 • बेकिंग सोडा - 1/4 लहान चमचा
 • लिंबाचा रस - अर्धा लहान चमचा
 • मीठ - 1 लहान चमचा

मुगाच्या डाळीची खस्ता कचोरी | How to make Moong daal ki khasta kachori Recipe in Marathi

 1. मुगाची डाळ धुवा आणि 1 तास भिजवून ठेवा. जाड तळाच्या एका भांड्यात तेल गरम करा, त्यात बडीशेप, जिरे, हिंग, धणे, चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
 2. मुगाच्या डाळीचे सर्व पाणी काढून टाका. एका कढईत घालून परता. त्यात एक कप पाणी आणि मीठ घाला. मंद आचेवर झाकून शिजवा.
 3. उरलेले मसाले देखील घाला आणि थोडेसे कुस्करा. चिरलेला पुदिना, कोथिंबीर घालून आचेवरून उतरावा.
 4. एक मोठ्या वाडग्यात मैदा, बेकिंग सोडा, मीठ घ्या आणि एकजीव करा. तेल, लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिसळा.
 5. एक मऊ कणिक तयार करा आणि 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. एकसमान आकाराचे गोळे करा. त्यात सारख्या भागात डाळीचे मिश्रण भरा आणि सर्व बाजूंनी बंद करा.
 6. कोरडे पीठ शिंपडून त्यावर गोळा ठेऊन थोडेसे मध्यम जाडसर कचोरी लाटा. आणि मध्यम आचेवर तळा.
 7. दोन्ही बाजूंना खुसखुशीत आणि सोनेरी रंगाची होईपर्यंत तळा. अतिरिक्त तेल काढण्यासाठी एका पेपर नॅपकीनवर ठेवा. आणि गरमागरम वाढा.

My Tip:

तुम्ही अर्धे गव्हाचे पीठ आणि अर्धा मैदा वापरू शकता.

Reviews for Moong daal ki khasta kachori Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo