मुख्यपृष्ठ / पाककृती / खट्टा ढोकळा

Photo of Khatta Dhokla by Bindiya Sharma at BetterButter
38259
630
4.6(0)
0

खट्टा ढोकळा

Jul-15-2015
Bindiya Sharma
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी तांदूळ (कोणत्याही प्रकारचे)
  2. 1/2 कप आंबट दही
  3. आवश्यकतेनुसार पाणी
  4. मीठ स्वादानुसार
  5. 1/2 लहान चमचा ताजा लिंबाचा रस
  6. 1/4 वाटी उडीद डाळ
  7. 1 लहान चमचा इनो फ्रुट सॉल्ट (लेमन)
  8. 2 हिरव्या मिरच्या
  9. आलं - 1 इंचाचा तुकडा
  10. एक चिमुटभर हिंग
  11. 1/4 लहान चमचा तेल
  12. सजविण्यासाठी कोथिंबीर आणि लांब चिरलेल्या मिरच्या

सूचना

  1. तांदूळ आणि उडीदडाळ 4 तास भिजवून ठेवा, नंतर त्यातील पाणी काढून त्यात आलं आणि हिरव्या मिरच्या घालून, कमीत कमी पाणी घालून वाटा. मग त्यात दही घाला आणि व्यवस्थित मिसळा.
  2. त्याला रात्रभर आंबविण्यासाठी झाकून ठेवा.
  3. मिश्रण इडलीच्या मिश्रणासारखे तयार होईल.
  4. आता यात मीठ, लिंबाचा रस आणि हिंग घालून नीट हलवा.
  5. प्रेशर कुकरमध्ये ठेवता येईल इतक्या आकाराचे खालील बाजू सपाट असलेले एक भांडे घ्या आणि त्याला हलक्या हाताने आतून तेल लावा. कुकरमध्ये थोडे पाणी घालून 6-8 मिनिटे गरम करा.
  6. शेवटी त्यात इनो फ्रुट सॉल्ट आणि 1/4 लहान चमचा तेल घालून त्वरित हलवा.
  7. आता तेल लावलेल्या भांड्यात तयार केलेले मिश्रण घाला आणि फॉईलने ते भांडे झाका.
  8. कुकरची शिटी काढून घ्या आणि नंतर त्यात ते भांडे कुकरमध्ये काळजीपूर्वक ठेवा.
  9. कुकर झाका आणि 25 मिनिटांसाठी शिटी लावल्याशिवाय शिजवा.
  10. उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि कोथिंबीरीने सजवा आणि वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर