BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Medu Vada

Photo of Medu Vada by Sonia Shringarpure at BetterButter
0
69
0(0)
0

मेदू वडा

Jan-21-2017
Sonia Shringarpure
210 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदू वडा कृती बद्दल

मेदू वडा - भारतीय डोनट ... मला लहानपणापासून आता देखील खूप आवडतो . वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ असतो. हे वडे भिजवलेले काळे हरभरे बारीक दळून त्यापासून बनविलेल्या घट्ट बॅटरपासून तयार करतात.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • साऊथ इंडियन
 • फ्रायिंग
 • अॅपिटायजर
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

 1. कमीत कमी 3 तास पाण्यात भिजवलेली 2 कप उडीद डाळ
 2. चिरलेले आल्ले 1 इंच
 3. चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या
 4. पातळ स्लाईस केलेली 1 हिरवी मिरची
 5. चिरलेली कोथिंबीर 3 टेबल स्पून
 6. थोडासा कढीपत्ता
 7. चवीनुसार मीठ
 8. तळण्यासाठी तेल

सूचना

 1. उडीद डाळ भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे.
 2. डाळीसोबत हिरवी मिरची, कढीपत्ता व आल्ले दळून त्याची बारीक पेस्ट बनवावी ( 3 भागात )
 3. बाऊलमध्ये काढून त्यात स्लाईस केलेली मिरची, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे.
 4. बॅटर 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे .
 5. खोल भांडे / कढईत तेल गरम करावे. बाऊलमध्ये थोडे स्वच्छ पाणी घ्यावे .
 6. मोठा सपाट वाडगा हाताशी ठेवावा.
 7. वाडग्याचा तळ भाग ओलसर करून घ्यावा , मोठ्या लिंबाच्या आकाराएवढे बॅटर घ्यावे आणि वाडग्याच्या तळाशी ठेवावे. ओल्या बोटाने त्यामध्ये भोक पाडावे.
 8. ते बॅटर मध्यम गरम तेलात सोडावे आणि बॅटर मोकळे होईपर्यंत वाडगा पकडावा, वाडगा सहजपणे वेगळा करता येतो .
 9. दोन्ही बाजूंनी सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळावे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर