मेदू वडा | Medu Vada Recipe in Marathi

प्रेषक Sonia Shringarpure  |  21st Jan 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Medu Vada recipe in Marathi,मेदू वडा , Sonia Shringarpure
मेदू वडा by Sonia Shringarpure
 • तयारी साठी वेळ

  3

  1 /2तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

292

0

मेदू वडा recipe

मेदू वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Medu Vada Recipe in Marathi )

 • कमीत कमी 3 तास पाण्यात भिजवलेली 2 कप उडीद डाळ
 • चिरलेले आल्ले 1 इंच
 • चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या
 • पातळ स्लाईस केलेली 1 हिरवी मिरची
 • चिरलेली कोथिंबीर 3 टेबल स्पून
 • थोडासा कढीपत्ता
 • चवीनुसार मीठ
 • तळण्यासाठी तेल

मेदू वडा | How to make Medu Vada Recipe in Marathi

 1. उडीद डाळ भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे.
 2. डाळीसोबत हिरवी मिरची, कढीपत्ता व आल्ले दळून त्याची बारीक पेस्ट बनवावी ( 3 भागात )
 3. बाऊलमध्ये काढून त्यात स्लाईस केलेली मिरची, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे.
 4. बॅटर 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे .
 5. खोल भांडे / कढईत तेल गरम करावे. बाऊलमध्ये थोडे स्वच्छ पाणी घ्यावे .
 6. मोठा सपाट वाडगा हाताशी ठेवावा.
 7. वाडग्याचा तळ भाग ओलसर करून घ्यावा , मोठ्या लिंबाच्या आकाराएवढे बॅटर घ्यावे आणि वाडग्याच्या तळाशी ठेवावे. ओल्या बोटाने त्यामध्ये भोक पाडावे.
 8. ते बॅटर मध्यम गरम तेलात सोडावे आणि बॅटर मोकळे होईपर्यंत वाडगा पकडावा, वाडगा सहजपणे वेगळा करता येतो .
 9. दोन्ही बाजूंनी सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळावे .

My Tip:

टीप --- एकदा तेलामध्ये बॅटर घातल्यावर डावाने वड्यावर गरम तेल घालत रहावे, नाहीतर ते पलटताना पाॅटला चिकटतील. एकाच वेळी अनेक वडे तळू नयेत. माझ्या कढईत एकावेळी दोन वडे मावतात. या बॅटरपासून 12 वडे बनतात.

Reviews for Medu Vada Recipe in Marathi (0)