डाल फ्राय | Daal Fry Recipe in Marathi

प्रेषक Ms. Falguni Kapadia  |  6th Oct 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Daal Fry by Ms. Falguni Kapadia at BetterButter
डाल फ्रायby Ms. Falguni Kapadia
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3427

0

डाल फ्राय recipe

डाल फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Daal Fry Recipe in Marathi )

 • अर्धी वाटी - तूरडाळ (अर्धा तास भिजवून शिजवलेली)
 • आवश्यकतेनुसार तेल
 • 1 लहान चमचा - हिंग
 • 3 मोठे चमचे - तूप
 • 2 मोठे चमचे - लसूण (बारीक चिरलेला)
 • 2 मोठे चमचे - आल्याची पेस्ट
 • 3 - लवंगा
 • 1 लहान चमचा - हिरव्या मिरच्यांची पेस्ट
 • 1 कांदा - बारीक चिरलेला
 • 1 - टोमॅटो (बारीक चिरलेला)
 • 2 लहान चमचे - लाल तिखट
 • अर्धा लहान चमचा - हळद
 • 1 लहान चमचा - गरम मसाला
 • फोडणीसाठी :
 • 2 मोठे चमचे - तेल
 • 1 मोठा चमचा - जिरे
 • 2 लहान चमचे - लाल तिखट
 • 3 - मधून चिरलेल्या मिरच्या
 • 2 मोठे चमचे - कोथिंबीर
 • वाढताना लिंबाचा रस

डाल फ्राय | How to make Daal Fry Recipe in Marathi

 1. अर्धा तास तूरडाळ भिजवून ठेवा. प्रेशर कुकरमध्ये पुरेसे पाणी, तेल, हिंग आणि मीठ घालून शिजवा.
 2. थंड होऊ द्या. एका कढईत तूप आणि तेल गरम करा. जिरे आणि लवंगा तडतडवा. तडतडल्यानंतर त्यात लसूण घालून परता. नंतर आल्याची पेस्ट घालून 1 मिनिट परता. कांदा घाला आणि गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता.
 3. चिरलेले टोमॅटो घालून 2 मिनिटे परता.
 4. आता त्यात लाल तिखट, हळद, हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून नीट हलवा.
 5. आता त्यात शिजवलेली डाळ मिक्स करा. नंतर गरम मसाला घाला. आवश्यक वाटल्यास पाणी घाला आणि नीट मिक्स करा.
 6. फोडणीसाठी: एका लहान भांड्यात तेल गरम करा. त्यात जिरे तडतडवा. ते पूर्ण तडतडले की गॅस बंद करा आणि फोडणीत लाल तिखट आणि मधून चिरलेल्या काही मिरच्या घाला.
 7. ही फोडणी डाळीवर घाला आणि कोथिंबीरीने सजवा.
 8. लिंबू आणि जीरा राईसबरोबर गरम गरम वाढा आणि आनंद घ्या!

My Tip:

तुम्हाला अधिक तिखट आणि मसालेदार हवे असल्यास, त्यात लाल आणि हिरव्या दोन्ही मिरच्यांचे आणि गरम मसाल्याचे प्रमाण वाढवा.

Reviews for Daal Fry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo