मुख्यपृष्ठ / पाककृती / छोले भटुरे

Photo of Chole Bhature by Anju Bhagnari at BetterButter
6114
111
4.6(0)
1

छोले भटुरे

Mar-08-2017
Anju Bhagnari
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले भटुरे कृती बद्दल

एक प्रतिष्ठित असे उत्तर भारतीय व्यंजन, ज्याच्या पोट आणि मनास संतुष्ट करण्याच्या खरोखरच "अन्नाचा आत्मा" असे वर्णन केले जाऊ शकते. लिंबाच्या रस शिंपडलेल्या कांद्याचा कापासह, मसालेदार, गरम छोलेमध्ये बुडविलेले स्वादिष्ट आणि कुरकुरीत भटुरे पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही?

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. भटुऱ्यां साठी - 2 वाट्या मैदा
  2. अर्धा कप दही (मऊ पीठ मळण्यासाठी गरजेनुसार)
  3. मीठ स्वादानुसार
  4. तेल 1 मोठा चमचा
  5. काबुली चणे छोल्यांसाठी- 2 वाट्या
  6. कांदे, 2 मोठे काप बनविलेले
  7. टोमेटो, 2 चिरलेले
  8. हिरवी मिरची 1
  9. आले लसणाची पेस्ट 1 लहान चमचा
  10. लाल मिरची पूड 1 लहान चमचा
  11. जिरेपूड 1 लहान चमचा
  12. धणेपूड 1 लहान चमचा
  13. गरम मसाला 1 लहान चमचा
  14. हळद अर्धा लहान चमचा
  15. छोले मसाला 1 लहान चमचा
  16. मीठ स्वादानुसार
  17. पाणी गरजेनुसार
  18. तेल तळण्यासाठी
  19. लिंबाच्या फोडी आणि गोल कापलेला कांदा - वाढण्यासाठी

सूचना

  1. छोले पाककृती- 2 वाट्या छोले रात्रभर भिजवून ठेवा.
  2. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात मीठ, अर्धा लहान चमचा लाल तिखट, 1/4 लहान चमचा हळद, अर्धा लहान चमचा गरम मसाला घाला.
  3. मोठ्या विस्तवावर 4-5 कप पाणी घालून प्रेशर कूकरमध्ये 3 शिट्या होईपर्यंत शिजवा.
  4. ते मऊ होतील आणि 95% शिजतील.
  5. रस्सा बनविण्यासाठी, एका प्रेशर कूकरमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करा.
  6. कापलेला कांदा घाला.
  7. मंद विस्तवावर 10 मिनिटे बदामी रंगाचा होईपर्यंत परता. अधूनमधून हलवत रहा.
  8. 1 लहान चमचा जिरेपूड, मीठ, 1 लहान चमचा धणेपूड, अर्धा लहान चमचा गरम मसाला, अर्धालहान चमचा लाल तिखट, 1 लहान चमचा छोले मसाला आणि 1 लहान चमचा आले लसणाची पेस्ट यांच्यासारखे सुके मसाले घाला.
  9. 1 मिनिट तळा आणि नंतर त्यात टोमॅटो आणि हिरवी मिरची घाला.
  10. टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत तळा.
  11. 1 कप पाणी घाला.
  12. मोठ्या विस्तवावर 1 शिटी होईपर्यंत शिजवा.
  13. शिजल्यानंतर काढून घ्या, नंतर हँड ब्लेन्डरने रश्श्याला एकजीव करा.
  14. हे याप्रमाणे दिसेल.
  15. एका भांड्यात शिजवलेले छोले घालून मंद विस्तवावर 10 मिनिटांसाठी तळण्यासाठी झाकण लावून ठेवा.
  16. त्यात 1 कप पाणी घालून 1 शिटी होईपर्यंत शिजवा, जेणेकरून छोल्यांना रश्श्याचा सुगंध येईल.
  17. प्रेशर आपणहून कमी होऊन झाकण उघडू द्या आणि वाढण्यासाठी छोले तयार आहेत.
  18. भटुरे बनविण्याची कृती - एका मोठ्या वाडग्यात मैदा, दही, स्वादानुसार मीठ आणि 1 लहान चमचा तेल घ्या.
  19. मऊ कणिक मळा.
  20. 3 तासांपर्यंत (उन्हाळ्यात) किंवा 5 तासांपर्यंत (हिवाळ्यात) त्याला न हलविता ते किंचित फुलेपर्यंत बाजूला ठेवा.
  21. भटुरे तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करा.
  22. दरम्यान, पीठाचे छोटे गोळे घ्या आणि पुरी/पोळीसारखे लाटा.
  23. कणिक मऊ झाले असल्यामुळे, लाटताना लावण्यासाठी कोरडे पीठ वापरा.
  24. मंद किंवा मध्यम विस्तवावर तळा.
  25. खाचा असलेल्या चमच्याने दाबा, जेणेकरून भटुरे फुलतील.
  26. दोन्ही बाजू बदामी रंगाचे होईपर्यंत तळा.
  27. टिश्यु पेपरवर काढा, ज्यामुळे त्यातील अतिरिक्त तेल निघून जाईल. गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर