बटाटा पिझ्झा | Potato Pizza Recipe in Marathi

प्रेषक Ishika Thakur  |  9th Oct 2015  |  
3 from 1 review Rate It!
 • Photo of Potato Pizza by Ishika Thakur at BetterButter
बटाटा पिझ्झा by Ishika Thakur
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

8305

1

Video for key ingredients

 • How To Make Pizza Dough

 • Homemade Pizza Sauce

बटाटा पिझ्झा recipe

बटाटा पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Pizza Recipe in Marathi )

 • बेस बनविण्यासाठी : 2 मोठे बटाटे
 • 1 लहान चमचा - मिक्स्ड हर्ब्स
 • मीठ स्वादानुसार
 • लिंबाचा रस - 2 लहान चमचे
 • टॉपिंगसाठी : 1 गाजर किसलेले
 • अर्धी - बारीक चिरलेली हिरवी भोपळा मिरची
 • 1 - बारीक चिरलेला कांदा
 • मीठ स्वादानुसार
 • 3 मोठे चमचे - किसलेले प्रोसेस्ड चीज
 • आवश्यकतेनुसार पिझ्झा सॉस

बटाटा पिझ्झा | How to make Potato Pizza Recipe in Marathi

 1. बटाटे उकडावा आणि थंड झाल्यावर सोलून घ्या. नंतर त्याचे मोठे मोठे काप करा.
 2. या बटाट्याच्या कापांना मिक्स्ड हर्ब्स, मीठ आणि लिंबाच्या रसात 10 मिनिटांसाठी मेरीनेट करा.
 3. आता एका नॉन स्टीक पॅन किंवा तव्यावर बटाट्यांना थोडे तेल लाऊन भाजा. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी भाजा.
 4. एका वेगळ्या वाडग्यात चीज व्यतिरिक्त टॉपिंगचे सर्व घटक एकत्र करा. एका कढईत थोडे तेल घालून भाज्या शिजेपर्यंत परता. शेवटी पिझा सॉस घाला.
 5. पिझ्झा तयार करण्यासाठी टॉपिंगच्या मिश्रणाला भाजलेल्या बटाट्याच्या कापांवर घाला. झाका आणि 5 मिनिटांसाठी शिजवा. नंतर झाकण काढून घ्या आणि टॉपिंग एका चमच्याने दाबा, ज्यामुळे ते व्यवस्थित चिकटतील.
 6. नंतर त्यावर किसलेले चीज घाला आणि पुन्हा 2 मिनिटे झाकून शिजवा किंवा चीज वितळेपर्यंत शिजवा. आता बटाटा पिझ्झा वाढण्यासाठी तयार आहेत.
 7. हा टिफिन किंवा सायंकाळी 4 वाजता लागणाऱ्या भुकेसाठी एक परफेक्ट नाश्ता आहे.

My Tip:

बटाट्याचा बेस कुरकुरीत असल्यामुळे ते नरम पडणार नाही.

Reviews for Potato Pizza Recipe in Marathi (1)

Vidya Gurava year ago

Mst nashta.........
Reply

Cooked it ? Share your Photo