मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पिझ्झा

Photo of Potato Pizza by Ishika Thakur at BetterButter
3859
1395
4.5(1)
0

बटाटा पिझ्झा

Oct-09-2015
Ishika Thakur
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • फ्युजन
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. बेस बनविण्यासाठी : 2 मोठे बटाटे
  2. 1 लहान चमचा - मिक्स्ड हर्ब्स
  3. मीठ स्वादानुसार
  4. लिंबाचा रस - 2 लहान चमचे
  5. टॉपिंगसाठी : 1 गाजर किसलेले
  6. अर्धी - बारीक चिरलेली हिरवी भोपळा मिरची
  7. 1 - बारीक चिरलेला कांदा
  8. मीठ स्वादानुसार
  9. 3 मोठे चमचे - किसलेले प्रोसेस्ड चीज
  10. आवश्यकतेनुसार पिझ्झा सॉस

सूचना

  1. बटाटे उकडावा आणि थंड झाल्यावर सोलून घ्या. नंतर त्याचे मोठे मोठे काप करा.
  2. या बटाट्याच्या कापांना मिक्स्ड हर्ब्स, मीठ आणि लिंबाच्या रसात 10 मिनिटांसाठी मेरीनेट करा.
  3. आता एका नॉन स्टीक पॅन किंवा तव्यावर बटाट्यांना थोडे तेल लाऊन भाजा. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी भाजा.
  4. एका वेगळ्या वाडग्यात चीज व्यतिरिक्त टॉपिंगचे सर्व घटक एकत्र करा. एका कढईत थोडे तेल घालून भाज्या शिजेपर्यंत परता. शेवटी पिझा सॉस घाला.
  5. पिझ्झा तयार करण्यासाठी टॉपिंगच्या मिश्रणाला भाजलेल्या बटाट्याच्या कापांवर घाला. झाका आणि 5 मिनिटांसाठी शिजवा. नंतर झाकण काढून घ्या आणि टॉपिंग एका चमच्याने दाबा, ज्यामुळे ते व्यवस्थित चिकटतील.
  6. नंतर त्यावर किसलेले चीज घाला आणि पुन्हा 2 मिनिटे झाकून शिजवा किंवा चीज वितळेपर्यंत शिजवा. आता बटाटा पिझ्झा वाढण्यासाठी तयार आहेत.
  7. हा टिफिन किंवा सायंकाळी 4 वाजता लागणाऱ्या भुकेसाठी एक परफेक्ट नाश्ता आहे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Sep-16-2018
Vidya Gurav   Sep-16-2018

Mst nashta.........

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर