चिकन बिर्याणी | Chicken Biryani Recipe in Marathi

प्रेषक silpa jorna  |  11th Oct 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chicken Biryani by silpa jorna at BetterButter
चिकन बिर्याणी by silpa jorna
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

310

0

Video for key ingredients

  चिकन बिर्याणी

  चिकन बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chicken Biryani Recipe in Marathi )

  • बासमती तांदुळ - 2 कप
  • तुकडे केलेले चिकन - 500 ग्राम
  • हिरव्या मिरच्या - 2
  • चिरलेला कांदा - 1
  • चिरलेला टोमॅटो - 1
  • नारळाचे दूध - 1 कप
  • वेलदोडा - 1
  • दालचिनी - 1 पट्टीचे तुकडे
  • लवंग - 3
  • स्टार बडीशेप - 1
  • कोथिंबीर - 1 जुडी
  • गरजेनुसार मीठ
  • मिरची पावडर - 1 टी स्पून
  • तेल - 3 टेबल स्पून
  • हळद पावडर - 1 टी स्पून
  • आल्ले लसूण पेस्ट - 2 टेबल स्पून
  • तमालपत्र - 1
  • गरम मसाला - 1 टी स्पून

  चिकन बिर्याणी | How to make Chicken Biryani Recipe in Marathi

  1. चिकन स्वच्छ धुवून घ्यावे , त्यात मीठ, मिरची पावडर, हळद पावडर मिसळून घ्यावी आणि बाजूला ठेवावे.
  2. तांदुळ धुवून 20 मिनिटांपर्यंत भिजवून ठेवावेत.
  3. प्रेशर कुकर घेऊन त्यात तेल टाकणे. तेल गरम झाल्यावर मसाले घालून परतावे. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून अर्धपारदर्शक होईपर्यंत तळावे.
  4. आता आल्ले - लसूण पेस्ट घालून तळावे.
  5. त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत तळावे . त्यात चिकन घालावे, गरम मसाला आणि थोडे पाणी ( 1/4 कप ) घालून तयार होईपर्यंत उकळू द्यावे.
  6. तांदळातील पाणी काढून टाकावे आणि ते चिकन मध्ये मिसळावे. त्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि नारळाचे दूध घालावे.
  7. 2 कप तांदळासाठी 3 1/2 कप पाणी प्रमाण असले पाहिजे. प्रमाणानुसार जुळवून घ्यावे , कोथिंबीर घालावी आणि झांकण लावून 2 शिट्ट्या होऊ द्याव्यात.
  8. वाफ पूर्णपणे जिरू द्यावी आणि बाऊलभर रायत्या सोबत गरमागरम खायला द्यावा.

  My Tip:

  काहीही नाही.

  Reviews for Chicken Biryani Recipe in Marathi (0)