मुख्यपृष्ठ / पाककृती / चणा मसाला (महाराष्ट्रीयन स्टाईल)

Photo of Chana Masala. ( Maharashtrian style) by Manisha Shukla at BetterButter
6346
142
5.0(0)
0

चणा मसाला (महाराष्ट्रीयन स्टाईल)

Mar-27-2017
Manisha Shukla
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चणा मसाला (महाराष्ट्रीयन स्टाईल) कृती बद्दल

कांद्याबरोबर चणा शिजवल्याने सुरेख सुगंध येतो आणि व्यंजनाला स्वादही छान येतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चणा (सुके) 1/2 वाटी
  2. कांदे 2
  3. टोमॅटो दीड
  4. किसलेले खोबरे (सुके, ओले) 1 मोठा चमचा / नारळाचे दूध
  5. आले किसलेले 1 लहान चमचा
  6. लसूण ठेचलेला 1 लहान चमचा
  7. खडा मसाला (दालचिनी, लवंगा, मिरे, तमालपत्र)
  8. धणेपूड 1 लहान चमचा
  9. हळद 1/2 लहान चमचा
  10. मीठ, लाल तिखट स्वादानुसार तेल 2
  11. तेल 2 लहान चमचे
  12. सजविण्यासाठी : बारीक चिरलेली कोथिंबीर 2 लहान चमचे
  13. ताजी साय 1 मोठा चमचा

सूचना

  1. चणे धुवा. कांदे चिरा.
  2. प्रेशर पॅनमध्ये तेल गरम करा.
  3. त्यात खडा मसाला घाला. त्याला तडतडू द्या.
  4. वाटण्यासाठी पॅनमधून काढून घ्या.
  5. आता कांदा घालून परता.
  6. त्यात किसलेले आले, लसूण, धणेपूड, हळद आणि लाल तिखट घाला.
  7. 2 मिनिटे परता. आता त्यात गरम पाणी घाला.
  8. जसे पाणी उकळायला लागले की त्यात चणे घालून चांगले मिसळा. 5 ते 6 शिट्या होईपर्यंत शिजवा.
  9. टोमॅटो ब्लेंड करा. एका वेगळ्या कढईत तेल गरम करा. त्यात ब्लेंड केलेलं टोमॅटो घालून परता.
  10. आता टोमॅटोमध्ये किसलेले खोबरे घाला. तुम्ही नारळाचे दूध सुद्धा वापरू शकता. परंतु ते टोमॅटो चांगले परतले गेल्यानंतर घालावे लागेल.
  11. टोमॅटो खोबऱ्याच्या मिश्रणाला चांगले परता.
  12. चांगले परतल्यानंतर त्यात ताजा वाटलेला गरम मसाला घाला.
  13. आता शिजवलेले चणे घाला. त्यांना पाहताच तोंडाला पाणी येत नाही का?
  14. आता चण्यात टोमॅटो खोबऱ्याचे मिश्रण घाला.
  15. ताजी साय घ्या आणि ढवळा.
  16. रश्यात घाला आणि चांगले एकजीव करा.
  17. तुमच्या चवीप्रमाणे मसाला बनवा. कोथिंबीरीच्या पानांनी सजवून वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर