मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन बिर्याणी/बिर्याणी - तमिळ मुस्लीम स्टाईल

Photo of Chicken Biriyani/Biryani - Tamil Muslim Style by Prachi Pawar at BetterButter
28060
93
5.0(0)
1

चिकन बिर्याणी/बिर्याणी - तमिळ मुस्लीम स्टाईल

Jul-20-2015
Prachi Pawar
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • डिनर पार्टी
  • तामिळ नाडू
  • प्रेशर कूक
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन: 1 किलो (धुऊन स्वच्छ केलेले)
  2. बासमती तांदूळ: 1 किलो
  3. कांदे - 5-6 मध्यम (पातळ काप केलेले)
  4. टोमॅटो - 5 मध्यम (पातळ काप केलेले)
  5. आले-लसणाची पेस्ट - अडीच मोठे चमचे
  6. गरम मसाला - 1 मोठा चमचा
  7. कोथिंबीर - 1 जुडी (स्वच्छ करून दोन भाग करा)
  8. पुदिन्याची पाने - 1 जुडी (स्वच्छ करून दोन भाग करा)
  9. हिरव्या मिरच्या - 5-6 (तुम्हाला बिर्याणी किती तिखट हवी आहे त्यावर अवलंबून आहे)
  10. लाल तिखट - 2 मोठे चमचे
  11. हळद - 2 लहान चमचे
  12. बिर्याणी मसाला - 1 मोठा चमचा (विकत आणलेला)
  13. दही - 200 ग्रॅम्स
  14. तूप - 100 ग्रॅम्स
  15. सनफ्लॉवर तेल - 4 मोठे चमचे

सूचना

  1. एक ग्लास घ्या आणि तांदूळ मापा. धुवा, भिजवा आणि बाजूला ठेवा. त्याच ग्लासाने पाणी मापा (4 ग्लास तांदूळ असतील तर 6 ग्लास पाणी घ्या) आणि शिजवण्याच्या भांड्यात घाला. या पाण्याला मध्यम आचेवर उकळू द्या.
  2. एका दुसऱ्या भांड्यात चिकन, चिरलेले टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडा पुदिना, दही, लाल तिखट आणि हळद घाला. हाताने नीट मिसळा. झाकून बाजूला ठेवा.
  3. त्यादरम्यान, एका प्रेशर कुकरमध्ये तेल आणि तूप गरम करा. यात गरम मसाल्याबरोबर उरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून करपल्याशिवाय काळजीपूर्वक तळा.
  4. कांद्याचे काप घालून बदामी रंगाचे होईपर्यंत तळा. आता त्यात आले-लसणाची पेस्ट घाला आणि त्याचा कच्चा गंध जाईपर्यंत परता.
  5. आता यात मेरीनेट केलेले चिकन घालून मध्यम आचेवर एकजीव करा. यात बिर्याणी मसाला घालून परता.
  6. पहिल्या पायरीत मोजमाप केलेले गरम पाणी मिठासह घाला. जर तुम्हाला चमचमीत बिर्याणी हवी असेल, तर यावेळीच थोड्या अधिक हिरव्या मिरच्या घालून एकत्र करा.
  7. भिजवलेल्या तांदळातील पाणी काढा आणि हे वरील उकळत्या पाण्यात घाला. हळूहळू हलवा. झाकण ठेवा आणि वाफ बाहेर यायला लागली की त्यावर शिटी लावा.
  8. 10-12 मिनिटे शिजवा आणि आच बंद करा. शक्य तितके लवकर, काळजीपूर्वक वाफ बाहेर निघू द्या, जेणेकरून जेणेकरून भात लुसलुशीत राहील.
  9. झाकण काढा आणि एका डावने भाताला घड्याळाच्या काट्याच्या दिशेत किंवा विरुद्ध दिशेत हलवून एकजीव करा. भात मिक्स करण्याची ही महत्वाची पायरी आहे घड्याळाच्या दिशेत आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असे दोन्ही दिशेने मिक्स केले तर तांदूळ मोडतील. म्हणून कोणत्याही एका दिशेनेच हलवा.
  10. आता एका कॅसेरोलमध्ये काढून घ्या. भातावर थोडे तूप घाला. थोडा गरम मसाला आणि कोथिंबीरीचा शिडकाव करा. कांदा-काकडीची कोशिंबीर, चिकन 65 आणि वांग्याच्या रश्यासह गरमग्रम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर