मासालेदार चिकन सूप | Spicy Chicken Soup Recipe in Marathi

प्रेषक Sehej Mann  |  28th Oct 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Spicy Chicken Soup by Sehej Mann at BetterButter
मासालेदार चिकन सूप by Sehej Mann
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1137

0

मासालेदार चिकन सूप recipe

मासालेदार चिकन सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spicy Chicken Soup Recipe in Marathi )

 • 250 ग्रॅम्स शिजवलेले किंवा भाजलेले चिकन
 • 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला
 • 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरलेला किंवा ठेचलेला
 • 2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या किंवा ठेचलेल्या
 • 1/2 लहान चमचा मिरपूड
 • 1 लिटर चिकन उकळविलेले पाणी
 • 1/4 वाटी कांद्याची पात चिरलेली
 • 1 मोठा चमचा ओलिव्हचे तेल
 • मीठ स्वादानुसार
 • कोथिंबीर - सजविण्यासाठी

मासालेदार चिकन सूप | How to make Spicy Chicken Soup Recipe in Marathi

 1. चिकन घ्या. चिकनच्या तुकड्यांमधून हाडे वेगळी करा.
 2. मध्यम आचेवर एक कढईमध्ये तेल गरम करा, त्यात चिरलेला कांदा घाला आणि 1-2 मिनिटे तपकिरी होईपर्यंत परता.
 3. नंतर, त्यात आले आणि लसूण घालून, झाकून 1-2 मिनिटे शिजवा. नंतर त्यात मिरपूड आणि स्वादानुसार मीठ घालून चांगले हलवा.
 4. आता त्यात चिकनचे तुकडे आणि चिकनचे पाणी घाला आणि उकळी येईपर्यंत शिजवा.
 5. याला कोथिंबीरीने सजवा आणि गरमागरम ताज्या ब्रेडबरोबर वाढा.

Reviews for Spicy Chicken Soup Recipe in Marathi (0)