व्हेजिटेबल पुलाव | Vegetable Pulao Recipe in Marathi

प्रेषक Sehej Mann  |  29th Oct 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Vegetable Pulao by Sehej Mann at BetterButter
व्हेजिटेबल पुलावby Sehej Mann
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2674

0

व्हेजिटेबल पुलाव recipe

व्हेजिटेबल पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetable Pulao Recipe in Marathi )

 • 100 ग्रॅम्स बासमती तांदुळ
 • 1 लहान बारीक चिरलेला कांदा
 • 1/2 कप मिश्र भाज्या ( मटार, गाजर, टोमॅटो, फ्लाॅवर )
 • 1/2 लहान चमचा जीरे पूड ( भाजलेली )
 • 1/2 लहान चमचा गरम मसाला
 • 1/2 लहान चमचा जीरे
 • 1 लहान चमचा आल लसूण पेस्ट
 • 750 मिली पाणी
 • 2 तमालपत्र
 • 1 दगडफूल
 • 2 लवंगा
 • 1/2 तुकडा दालचिनी
 • 1 वेलदोडा
 • 1 मोठा चमचा तेल
 • चवीनुसार मीठ
 • मसाल्याचे साहित्य -
 • 1 तुकडा वेलदोडा
 • 1 दगडफुल
 • 2 लवंगा
 • 4-5 मिरे
 • अर्धा तुकडा दालचिनी

व्हेजिटेबल पुलाव | How to make Vegetable Pulao Recipe in Marathi

 1. तुम्ही शिजवायला सुरवात करण्यापूर्वी तांदुळ 15 मिनिटे भिजवून ठेवावेत. त्यानंतर एका भांड्यात पाण्यासोबत तमालपत्र, दगडफूल लहान तुकडा, 2 लवंगा, दालचिनी आणि वेलदोडा असा मसाला घालावा. हे मंद आचेवर शिजू द्यावे.
 2. त्यादरम्यान मसाल्याचे साहित्य कोरडे भाजून घ्यावेत आणि भरडसर दळून घ्यावेत.
 3. तांदुळ शिजल्यावर, तो प्लेटमध्ये समान पसरावा आणि तो थंड होऊ द्यावा.
 4. भाज्या 10 मिनिटे वाफेवर मऊ, तसेच कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्याव्यात.
 5. एक पॅन घेऊन त्यात तेल घालावे, तेल गरम झाल्यावर त्यात जीरे घालावे. जीरे तडतडू लागल्यावर कांदा घालून एक मिनिट परतून घ्यावे.
 6. त्यानंतर 1/2 लहान चमचा मसाल्याचे मिश्रणासोबत आले-लसणाची पेस्ट टाकावी. तसेच त्यामध्ये भाजलेली जीरे पावडर व गरम मसाला पावडर घालावा.
 7. ढवळून व्यवस्थित मिसळून घ्यावे आणि चवीनुसार मीठ घालावे. आता भाज्या घालून परतावे आणि 1-2 मिनिटे शिजवून घ्यावे .
 8. आता शेवटी, भात घालावा. झाकण लावून आणखी 2-3 मिनिटे शिजवावे.
 9. आपल्या आवडत्या शाकाहारी किंवा मांसाहारी रश्याबरोबर खायला द्यावे.

Reviews for Vegetable Pulao Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo