BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Besan Ladoo

Photo of Besan Ladoo by Disha Khurana at BetterButter
5219
85
0(0)
0

बेसन लाडू

Nov-02-2015
Disha Khurana
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

ही दिवाळी व लक्ष्मीपूजन साजरे करण्यासाठी परिपूर्ण पदार्थ

रेसपी टैग

 • व्हेज
 • दिवाळी
 • राजस्थान
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

 1. 250 ग्रॅम हरभरा पीठ / लहान वाटाण्याचे पीठ / बेसन ( भरड पद्धतीचे )
 2. 100 ग्रॅम शुद्ध तूप
 3. 125-150 ग्रॅम पीठी साखर
 4. 50 ग्रॅम मनुका / चिरोंजी / बदाम ( ऐच्छिक )
 5. 1/2 टी स्पून वेलदोडा पावडर
 6. 1.5 टेबल स्पून दूध

सूचना

 1. बेसन आणि तूप एकजीव होईपर्यंत आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजावे , सतत हलवत रहावे.
 2. या प्रक्रियेला खूप वेळ लागतो, त्यामुळे कधी मध्यम तर कधी मंद आंच करावी, परंतु कधीही पूर्ण आंच करू नये, कारण त्यामुळे पीठ जळण्याची शक्यता जास्त असते.
 3. कायम कडेपासून पूर्ण वेळ हलवत रहाणे चालू ठेवणे.
 4. एकदा छान वास येऊ लागला , सुंदर सोनेरी रंग आला की त्यावर दूध शिंपडावे आणि पूर्णपणे एकजीव होण्यासाठी मिसळत रहावे आणि आंच लगेच बंद करावी , मिश्रण थंड होण्यासाठी एका मोठय़ा प्लेटवर ठेवावे.
 5. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात पीठी साखर, वेलदोडा पावडर टाकून एकत्र करावे.
 6. तुम्ही साखर, भाजलेले बेसन व तूप यांचे मिश्रण एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या छोट्या जारमध्ये एकावेळी थोडे थोडे मिश्रण करू शकता.
 7. एकदा मिश्रण एकजीव झाल्यावर त्यामध्ये सुकामेवा घालून त्याचे गोल गोल गोळे बनविणे .
 8. मिश्रण जर तुम्हाला जास्त मऊ वाटले तर आकार दिल्यानंतर आकार बिघडू नये म्हणून ते 20-30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवू शकता .
 9. बदाम, मनुका किंवा चिरोंजीने सजवणे आणि खायला देणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर