गोबी मंच्युरीयन | Gobi Manchurian Recipe in Marathi

प्रेषक Anjali Anupam  |  21st May 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Gobi Manchurian by Anjali Anupam at BetterButter
गोबी मंच्युरीयन by Anjali Anupam
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1183

0

गोबी मंच्युरीयन recipe

गोबी मंच्युरीयन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gobi Manchurian Recipe in Marathi )

 • 2 टेबल स्पून - परतण्यासाठी तेल
 • 1 टेबल स्पून - बारीक चिरलेले आल्ले व लसूण
 • 2 - हिरव्या मिरच्या
 • चवीनुसार पांढरी मिरी
 • 4 टेबल स्पून - कांद्याची हिरवी पात
 • 1 - सिमला मिरची
 • 1 - कांदा
 • अजिनोमोटो ( ऐच्छिक )
 • 1 टेबल स्पून हिरवी मिरची साॅस
 • 1 टेबल स्पून - व्हिनेगर
 • 2 टेबल स्पून सोया सॉस
 • साॅससाठी : 3 टेबल स्पून - टोमॅटो केचप
 • चवीनुसार लाल मिरची पावडर
 • 1 टेबल स्पून सोया सॉस
 • तळण्यासाठी तेल
 • चवीनुसार काळी मिरी
 • चवीनुसार मीठ
 • 1 - फ्लावर
 • 2 टेबल स्पून मक्याचे पीठ
 • 4 टेबल स्पून मैदा

गोबी मंच्युरीयन | How to make Gobi Manchurian Recipe in Marathi

 1. साॅस तयार करण्यासाठी : पॅनमध्ये 2 टेबल स्पून तेल टाकून गरम करून घ्यावे, आल्ले व लसूण टाकून परतावे , नंतर हिरवी मिरची व कांदा घालून परतावे. कांदा पारदर्शक झाल्यावर त्यात सिमला मिरची घालावी . आता मीठ , मिरी, लाल मिरची पावडर टाकून परतून घ्यावे .
 2. अजिनोमोटो आणि सर्व साॅसेज घालावीत , उच्च आचेवर सातत्याने परतत रहावे.
 3. 1 कप पाणी टाकून ते उकळू द्यावे, नंतर मक्याचे पीठ , पाणी घालून अर्धे पातळ करावे आणि साॅसमध्ये टाकावे. मिसळून घ्यावे आणि आंच बंद करावी.
 4. मक्याचे पीठ, मैदा, मिरी ,मीठ, अजिनोमोटो व 1 चमचा सोया सॉस घेऊन पातळ बॅटर तयार करावे.
 5. बॅटरमध्ये फ्लॉवरची फुले बुडवून ती कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळावीत.
 6. मंद आचेवर साॅस गरम करावे, त्यात फ्लाॅवर घालावा आणि छानपैकी हलवत रहावे. फ्लाॅवरवर साॅसचे आवरण पूर्ण बसल्याची खात्री करावी. त्यावर कांद्याची हिरवी पात टाकावी .
 7. गरमागरम खायला द्यावे.

My Tip:

अजिनोमोटो वापरणे ऐच्छिक आहे, तुम्ही नाही वापरले तरी चालेल.

Reviews for Gobi Manchurian Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo