मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पुलाव

Photo of Paneer Pulao by Femina Shiraz at BetterButter
2737
19
5.0(0)
0

पनीर पुलाव

May-23-2017
Femina Shiraz
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पुलाव कृती बद्दल

दुपारच्या जेवणासाठी त्वरीत आणि सोपी अशी भाताची पाककृती, पनीर आवडणाऱ्यांसाठी रोचक अशी. मुलांना सुध्दा ही आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. पनीर - 200 ग्रॅम्स
  2. लोणी - 2 मोठे चमचे
  3. गाजर - 2 (चिरलेले)
  4. फरसबी - 8 (चिरलेल्या)
  5. हिरवे वाटाणे - 1/2 वाटी
  6. कांदे - 2 (चिरलेले)
  7. टोमॅटो - 2 (चिरलेले)
  8. आले लसणाची पेस्ट - 1 लहान चमचा
  9. हिरव्या मिरच्या - 2
  10. हळद - 1/2 लहान चमचा
  11. वेलदोडे - 2
  12. लवंगा - 3
  13. दालचिनी - एक लहान तुकडा
  14. तमालपत्र - 1
  15. शिजवलेले घी तांदूळ - 4 वाट्या
  16. तूप - 1/4 कप
  17. वनस्पती तेल - 2 मोठे चमचे
  18. काजू - 2 मोठे चमचे
  19. आवश्यकतेनुसार मीठ

सूचना

  1. एका कढईत लोणी वितळवा.
  2. पनीरचे तुकडे बदामी रंगाचे होईपर्यंत तळा.
  3. कढईतून काढून घ्या आणि बाजूला ठेवा.
  4. त्याच कढईत तूप आणि तेल घाला.
  5. काजू तळा आणि नंतर वापरण्यासाठी बाजूला ठेवा.
  6. नंतर त्यात दालचिनी, लवंगा, वेलदोडे आणि तमालपत्र घालून एक मिनिट परता.
  7. कांदा घाला आणि मऊ आणि गुलाबी होईपर्यंत त्यांना परता.
  8. नंतर त्यात आले लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घाला आणि त्याचा उग्र वास जाईपर्यंत परता.
  9. नंतर गाजर, फरसबी आणि हिरवे वाटाणे घालून 2 मिनिटे परता.
  10. हळद घालून परता.
  11. नंतर चिरलेले टोमॅटो घाला आणि ते मऊ होईपर्यंत परता.
  12. आवश्यकतेनुसार मीठ घालून नीट हलवा.
  13. शिजवलेले घी तांदूळ घाला आणि नीट हलवा.
  14. तळलेल्या काजूंनी सजवा.
  15. लोणचे आणि रायत्याबरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर