वडा पाव | Vada Pav Recipe in Marathi

प्रेषक Rashmi Krishna  |  5th Nov 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Vada Pav by Rashmi Krishna at BetterButter
वडा पाव by Rashmi Krishna
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

3443

0

Video for key ingredients

 • Pav Buns

वडा पाव recipe

वडा पाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vada Pav Recipe in Marathi )

 • 1 पॅकेट पाव ब्रेड (बाजरात सहजपणे उपलव्ध असतात)
 • वड्यामध्ये भरण्यासाठी:
 • 3-4 उकडवून कुस्करलेले बटाटे
 • 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 2-3 किसलेल्या लसणाच्या पाकळ्या
 • 1 लहान चमचा मोहरी
 • चिमूटभर हिंग
 • 6 ते 8 कडीपत्त्याची पाने
 • अर्धा लहान चमचा हळद
 • 1 मोठा चमचा तेल + तळण्यासाठी तेल
 • वड्यावरील पड बनविण्यासाठी :
 • 3/4 वाटी बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ)
 • 1/4 लहान चमचा हळद
 • चिमूटभर सोडा
 • मीठ चवीनुसार

वडा पाव | How to make Vada Pav Recipe in Marathi

 1. एक पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करा आणि त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की, हिंग आणि कडीपत्ता घालून काही सेकंद परता.
 2. नंतर किसलेला लसूण आणि चिरलेल्या मिरच्या घालून काही सेकंद परता.
 3. आता त्यात बटाटे, हळद आणि मीठ घालून नीट मिसळा. या मिश्रणाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
 4. दरम्यान बेसन, हळद आणि सोडा एकत्र करा. त्यात थोडे (जवळजवळ 1/3 कप) पाणी घाला.
 5. बटाट्याचे मिश्रण थंड झाले की त्याचे एक सारखे गोळे करून घ्या.
 6. एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाले की, त्यात बेसनाच्या मिश्रणात एक एक बटाट्याचा गोळा भिजवून गरम तेलात सोडा.
 7. 8 गोळ्यांना गरम तेलात गुलाबी रंगाचे तळा. नंतर तेल निथळण्यासाठी पेपर नॅपकीनवर ठेवा.
 8. आता पाव मध्यभागातून कापा आणि त्यात एक वडा ठेवा आणि त्वरीत वाढा.
 9. मी वाढताना लिंबू आणि हिरवी मिरची देखील ठेवते.

Reviews for Vada Pav Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo