दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल | Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi

प्रेषक Shivani Jain Awdhane  |  31st May 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dal Tadka Restaurant Style by Shivani Jain Awdhane at BetterButter
दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल by Shivani Jain Awdhane
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1156

0

दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल recipe

दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi )

 • सुकी लाल मिरची 1
 • 5 लसूण पाकळ्या भरडसर दळलेल्या
 • जीरे 1 टी स्पून
 • मोहरी 1 टी स्पून
 • बटर / तूप टी स्पून
 • तडक्यासाठी :
 • चवीनुसार मीठ
 • धणे पावडर 1 टी स्पून
 • लाल मिरची पावडर 1 टी स्पून
 • हळद पावडर 1 टी स्पून
 • 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • कोथिंबीर 1/4 कप
 • लसूण 5 पाकळ्यांची भरडसर पेस्ट
 • 1 चिरलेला मोठा टोमॅटो
 • 1 चिरलेला मोठा कांदा
 • ताजी मलाई 1/2 कप
 • तूप/बटर 2 टी स्पून
 • मसूर / तुर / अरहर डाळ 1 कप

दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल | How to make Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi

 1. तुरडाळ धुवून घ्यावी आणि मंद आचेवर प्रेशर कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावी.
 2. शिजल्यावर तिला खोलीच्या तापमानापर्यंत थंड होऊ द्यावे.
 3. पॅन गरम करावा , तेल टाकावे, लसूण पेस्ट घालावी, त्यानंतर हिरवी मिरची टाकावी.
 4. आता कांदा टाकून तांबूस होईपर्यंत शिजवावा.
 5. आता चिरलेला टोमॅटो मिसळावा.
 6. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवावेत.
 7. आता हळद पावडर, लाल मिरची पावडर व धणे पावडर मिसळावी. हलवत रहावे आणि मसाल्यातून तेल बाहेर पडेपर्यंत शिजवावे.
 8. आता त्यामध्ये शिजलेली डाळ टाकावी .
 9. 1 कप गरम पाणी टाकून ते ढवळावे.
 10. डाळ उकळेपर्यंत मंद आचेवर शिजवावे .
 11. आता त्यात ताजी मलाई घालावी.
 12. चांगले मिसळून घ्यावे.
 13. आता कोथिंबीर व मीठ टाकावे.
 14. डाळ उकळेपर्यंत किंवा बुडबुडे येईपर्यंत शिजवावे, आंच बंद करावी.
 15. खायला द्यायच्या डीशमध्ये डाळ ओतावी.
 16. तडका तयार करण्यासाठी, पॅनमध्ये तूप गरम करावे, त्यात आधी हिंग नंतर मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात अगोदर लसूण मग सुकी लाल मिरची टाकावी .
 17. तडतडणे थांबल्यावर हा तडका डाळीवर टाकावा.
 18. झाकण लावावे ... खायला द्यायच्या वेळी झाकण काढावे .
 19. डाळ मिसळून घ्यावी आणि नंतर भात किंवा रोटी बरोबर खायला द्यावी.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Dal Tadka Restaurant Style Recipe in Marathi (0)