मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड उपमा

Photo of Bread Upma by Affaf Ali at BetterButter
3257
421
4.6(0)
0

ब्रेड उपमा

Nov-06-2015
Affaf Ali
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड उपमा कृती बद्दल

मन आणि डोक्याच्या चक्करमध्ये बिचारे पोट फसले. अखेरीस माझी चटपटीत 'ब्रेड उपमा'ची आवृत्ती उदयास आली. पनीर, बदाम, ब्राऊन ब्रेड आणि पिझ्झा सॉसचे एक आगळेवेगळे एकत्रीकरण. स्पष्ट सांगायचे म्हणजे, स्वयंपाकघरात या गोष्टी राहिल्या होत्या. त्यामुळे मी पुढे जाऊन ही छानशी गोष्ट बनविण्याचे ठरविले. पटकन करता येणारी व्यंजने मला फार आवडतात.

रेसपी टैग

  • टिफिन रेसिपीज

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्राऊन ब्रेड - 4 काप
  2. पनीर - 100 ग्रॅम्स
  3. कांदे - 2
  4. टोमॅटो - 2
  5. हिरवी मिरची - 1
  6. भोपळा मिरची - थोडे तुकडे
  7. बदाम - थोडेसे
  8. आले लसणाची पेस्ट - 1/4 लहान चमचा
  9. पिझ्झा सॉस - 4 लहान चमचे
  10. लाल तिखट - 1/4 लहान चमचा
  11. हळद - थोडीशी
  12. मीठ स्वादानुसार
  13. कोथिंबीरीची पाने - थोडीशी
  14. लिंबाचा रस - 1 लहान चमचा

सूचना

  1. ब्रेडचे काप आणि पनीरचे चौरस तुकडे करून बाजूला ठेवा.
  2. एका नॉन स्टीकच्या भांड्यात थोडे तेल घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घाला. थोडे मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर तळा. त्यात आले-लसणाची पेस्ट घाला. थोडे सेकंद्स तळा. टोमॅटोचे तुकडे घाला. मऊ होईपर्यंत तळा.
  3. नंतर त्यात मसाले, बदामाचे तुकडे, मीठ आणि पिझ्झा सॉस घाला. एक मिनिट तळून घ्या. ब्रेड, पनीर आणि भोपळा मिरचीचे तुकडे घाला. ब्रेडला एकसमान मसाला लागेपर्यंत मोठ्या आचेवर परतून घ्या. शेवटी थोडा लिंबाचा रस घाला आणि कोथिंबीरीने सजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर