सूजी ( रवा ) लाडू | Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi

प्रेषक Sushmita Amol  |  14th Nov 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sooji (Rava) Ladoo by Sushmita Amol at BetterButter
सूजी ( रवा ) लाडू by Sushmita Amol
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

915

0

सूजी ( रवा ) लाडू recipe

सूजी ( रवा ) लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi )

 • 1 टी स्पून - वेलदोडे पावडर
 • 4 टेबल स्पून - तूप
 • 3 टेबल स्पून - एकजीव होण्यासाठी गरम दूध
 • 2 टेबल स्पून - बारीक चिरलेले बदाम व मनुका
 • 3/4 कप - साखर
 • 1/3 कप - ताजे खवलेल्या नारळाचे खोबरे
 • 1 कप - सूजी ( रवा ) :

सूजी ( रवा ) लाडू | How to make Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi

 1. कढईमध्ये 1 टी स्पून तूप गरम करून त्यात बदाम व मनुका टाकून एक मिनिट परतून बाजूला ठेवावे.
 2. उरलेले तूप गरम करून घ्यावे, त्यात सूजी घालून 10-12 मिनिटे किंवा छान वास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मंद आचेवर भाजावे.
 3. त्यात अगोदर परतलेला सुकामेवा, साखर व वेलची ( वेलदोडे ) पावडर टाकून चांगले मिसळून घ्यावे. आंच बंद करावी.
 4. त्यामध्ये आता एकावेळी 1 टेबल स्पून गरम दूध टाकून मिसळून घ्यावे. होणारे मिश्रण लाडू वळण्या इतपत ओलसर असले पाहिजे.
 5. एका प्लेटमध्ये मिश्रण काढावे आणि ते गरम असताना गोल्फ आकाराचे लाडू वळावेत.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Sooji (Rava) Ladoo Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo