मुख्यपृष्ठ / पाककृती / कल्याणा रसम

Photo of Kalyana Rasam by Menaga Sathia at BetterButter
3945
71
5.0(0)
0

कल्याणा रसम

Nov-16-2015
Menaga Sathia
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • तामिळ नाडू
  • सूप

साहित्य सर्विंग: 4

  1. चिंच - एक लहान लिंबाच्या आकारएवढे
  2. टोमॅटो - 2 मोठे
  3. शिजवलेली तूरडाळ - 1/4 वाटी
  4. कडीपत्ते - 1 लहान काडी
  5. चिरलेली कोथिंबीर - 2 मोठे चमचे
  6. जिरे - अर्धा लहान चमचा
  7. हिरवी मिरची - 1
  8. हळद - अर्धा लहान चमचा
  9. मीठ - स्वादानुसार
  10. तूप - 1 लहान चमचा
  11. धणे - 2 लहान चमचे
  12. लाल सुक्या मिरच्या - 2
  13. मिरे - 1 लहान चमचा
  14. तूर डाळ - 2 लहान चमचे
  15. फोडणीसाठी तूप - 1 लहान चमचा
  16. मोहरी - अर्धा लहान चमचा
  17. जिरे - 1/4 लहान चमचा
  18. कडीपत्ता - थोडा
  19. हिंग - 1/4 लहान चमचा

सूचना

  1. चिंचेला गरम पाण्यात भिजवून त्याचा अर्क बनवा.
  2. एका पॅनमध्ये तूप आणि वाटण्यासाठीचे घटक घ्या. डाळ बदामी रंगाची होईपर्यंत परता आणि बाजूला ठेवा.
  3. 1 टोमॅटो आणि जिरे जाडेभरडे वाटून घ्या.
  4. एका भांड्यात चिंचेचा रस, मीठ, हळद, मधून चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेला 1 टोमॅटो घाला.
  5. चिंचेचा तीव्र गंध जाईपर्यंत उकळवा, नंतर त्यात वाटलेला मसाला घाला आणि एक मिनिटासाठी मिसळा.
  6. पुरेसे पाणी घाला आणि त्या मिश्रणात शिजवलेली तुरीची डाळ घालून मिसळा.
  7. सर्व बाजूंनी फेसाळ होईपर्यंत उकळवा, त्यात कडीपत्ता, कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा.
  8. शेवटी फोडणीचे घटक घालून फोडणी तडतडवा आणि रसममध्ये घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर