मुख्यपृष्ठ / पाककृती / बहुरंगी सँडविच ढोकळा

Photo of Multi colour sandwich dhokla by Ruchi Shah at BetterButter
3037
276
4.2(0)
0

बहुरंगी सँडविच ढोकळा

Nov-22-2015
Ruchi Shah
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • अॅपिटायजर
  • लॅक्टोज फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या तांदूळ
  2. अर्धी वाटी उडीदडाळ
  3. अर्धा कप बीटचा रस (लाल थर करण्यासाठी)
  4. अर्धी वाटी ताजी कोथिंबीर पुदिन्याची चटणी (हिरव्या थरासाठी)
  5. अर्धा चमचा हळद (पिवळ्या थरासाठी)
  6. 1 कप ताजे दही (आंबट असू नये)
  7. 1 वाटी कोथिंबीर पुदिन्याची चटणी दोन थरांमध्ये लावण्यासाठी
  8. इनो - 1 पॅकेट
  9. मीठ स्वादानुसार
  10. 3 लहान चमचे तेल
  11. 1 लहान चमचा मोहरी
  12. 1 लहान चमचा तीळ
  13. अर्धा लहान चमचा हिंग
  14. 1-2 सुक्या लाल मिरच्या
  15. 1-2 लहान चमचे चिरलेली ताजी कोथिंबीर
  16. थोडा कडीपत्ता

सूचना

  1. तांदूळ आणि उडीदडाळ घ्या आणि नीट धुवा. कमीत कमी 4-5 तास भिजवा. नंतर त्यातील पाणी काढून टाका. त्यात दही घालून मऊ पेस्टसारखे वाटून घ्या. मिश्रण थोडे जाडसर ठेवा.
  2. कमीत कमी 5-6 तास ते मिश्रण उबदार जागी ठेवा. मिश्रण इडलीच्या मिश्रणासारखे आंबलेले दिसणार नाही, तरीही त्याने चांगले काम होईल.
  3. ढोकळा मिश्रण नीट हलवा. मिश्रणाचा एक भाग घ्या त्यात मीठ, 2-3 लहान चमचे पाणी आणि बीटचा रस घाला. एकजीव करा. स्टीमर गरम झाले की मिश्रणात एक चमचाभर इनो घाला आणि व्यवस्थित फेटा.
  4. आता तेल लावलेल्या एका प्लेटमध्ये मिश्रण ओता आणि 6-8 मिनिटे झाकून शिजवा. काही वेळाने झाकण उघडा, ढोकळे थोडे घट्ट झाले असतील त्यावेळी त्यावर हिरवी चटणी घाला आणि नीट पसरावा आणि पुन्हा झाकून ठेवा.
  5. मिश्रणाचा दुसरा भाग घ्या. त्यात मीठ, 2-3 चमचे पाणी घालून नीट हलवा, आणि त्यावर चटणीचा थर लावा. झाकणाने झाकून 8-9 मिनिट शिजवा. ढोकळे बाहेर काढण्याअगोदर नेहमी टूथपीकने तपासा.
  6. जर टूथपीक स्वच्छ बाहेर आली की प्लेट बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. तोपर्यंत दुसरे 2 थर बनवा. योग्य संयोजनासाठी एकच आकाराच्या प्लेट्स घ्या.
  7. मिश्रणाचा एक भाग घ्या. त्यात मीठ, 2-3 चमचे पाणी आणि हिरवी चटणी घाला आणि एकजीव करा. इनो घालून तेल लावलेल्या गरम प्लेटमध्ये घालून झाकून 5-6 मिनिटे शिजवा. मिश्रणाचा एक भाग घ्या.
  8. त्यात मीठ, 2-3 चमचे पाणी आणि हळद घाला आणि एकजीव करा. इनो घाला आणि हिरव्या रंगाच्या थरावर घाला. झाकणाने झाकून 7-8 मिनिटे शिजू द्या. नंतर टूथपीकने तपासा आणि प्लेट बाहेर काढून थंड होऊ द्या.
  9. आता एकत्रपणे: एक मोठे ताट घ्या. ढोकळा प्लेट काळजीपूर्वक बाहेर काढा, जसे आपण बेक केलेल्या केकसाठी करतो. मागून ताटाला चापटी मारल्यास ढोकळा बाहेर येईल. त्यांना व्यवस्थित करा. पांढऱ्या थरावर थोडे लोणी ठेवा त्यावर हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे थर ठेवा.
  10. लोणी लावल्याने ढोकळे चिकटून राहतील आणि त्यांचा स्वाद आणि ओलावा वाढेल. या थरांना 1-2 मिनिटे मायक्रोवेव किंवा 3-4 मिनिटे स्टीमरमध्ये ठेऊ शकता. (ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही) आता ढोकळ्याच्या फोडणीसाठी-
  11. एका कढईत तेल घ्या. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की सुकलेल्या लाल मिरच्या, कडीपत्ता, तीळ आणि हिंग घाला. या फोडणीला ढोकळ्यावर पसरवा. एका मोठ्या धारदार चाकुने चौरस किंवा डायमंडच्या आकारात कापा.
  12. कोथिंबीर पसरवा. हिरवी चटणी किंवा चहा/कॉफी किंवा टोमॅटो केचपबरोबर वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर