Photo of Samosa by Gavneet Kaur at BetterButter
9662
88
5.0(0)
0

सामोसा

Aug-01-2017
Gavneet Kaur
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सामोसा कृती बद्दल

सामोसा हा बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये स्वादिष्ट भरावाने भरलेला उत्तर भारतीय खाद्यपदार्थ आहे. आपण भारतीयांना सामोसा खूप आवडतो पण त्याच्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे आपण स्वतः तयार करायचा प्रयत्न क्वचितच करतो. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला जर सामोसे आवडत असतील आणि थोडासा संयम असेल तर तुम्ही ते सहजपणे करू शकाल. घरी केलेले सामोसे हे केवळ स्वच्छ असतील असे नव्हे तर ते चविष्ट देखील असतील. सामोसे तुम्ही भरपूर तेलात तळू शकता . कमी चर्बीयुक्त पाहिजे असतील तर ते बेक देखील केले तरी चालतील. या पोस्टच्या शेवटी मी आपल्याला काही सूचना व युक्ती सांगेन, त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने छान चविष्ट सामोसे बनविता येतील.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • पंजाबी
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 8

  1. कणकेसाठी : ( 1 कप = 250 मिली )
  2. 2 कप मैदा
  3. 1 टी स्पून अजवाइन
  4. 5 टेबल स्पून तेल
  5. चवीनुसार मीठ
  6. जरूरीप्रमाणे पाणी
  7. भरावासाठी :
  8. 3 टी स्पून तेल
  9. 1 टी स्पून जीरे
  10. 5 शिजवलेले आणि साली काढलेले बटाटे
  11. 1 इंच चिरलेले आल्ले
  12. 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  13. 1/2 टी स्पून आमचूर
  14. 1/2 टी स्पून गरम मसाला पावडर
  15. कोथिंबीर
  16. चवीनुसार मीठ

सूचना

  1. एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात अजवाइन, मीठ व तेल घालावे.
  2. चांगल्या प्रकारे मिसळून त्याचे भरडसर मिश्रण तयार करावे.
  3. आता पाणी घालून जाडसर कणीक मळून घ्यावी.
  4. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे टाकावेत.
  5. लगदा केलेले बटाटे, मसाला पावडर व हिरव्या मिरच्या घालाव्यात.
  6. सामोसा आकार तयार करण्यासाठी, थोड्याशा कणकेचे 5 इंच परीघाचे वर्तृळ करून त्याचे 2 समान भाग कापावेत.
  7. आता एक अर्ध वर्तृळ घेऊन सरळ रेषेतील दोन कडा जोडाव्यात आणि त्याचा कोन बनवावा .
  8. कोनमध्ये एक टेबल स्पून भराव घालून पाण्याने कडा बंद कराव्यात.
  9. हा सुंदर प्रकार तळावा आणि हिरवी चटणी व चिंचेच्या चटणी बरोबर गरमागरम खायला द्यावा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर