सत्तू पराठा | Sattu Paratha Recipe in Marathi

प्रेषक sapana behl  |  24th Nov 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sattu Paratha by sapana behl at BetterButter
सत्तू पराठा by sapana behl
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2374

0

सत्तू पराठा recipe

सत्तू पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sattu Paratha Recipe in Marathi )

 • पाणी आवश्यकतेनुसार
 • परतण्यासाठी तेल
 • मीठ चवीनुसार
 • अर्धा लहान चमचा ओवा
 • 1 लहान चमचा जिरे
 • अर्धा लहान चमचा आमचूर (वाळलेल्या कैरीचा पावडर)
 • अर्धा लहान चमचा लाल तिखट
 • अर्धा लहान चमचा हळद
 • 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 2 लहान चमचे किसलेले आले
 • 1/4 वाटी चिरलेली कोथिंबीर
 • 1 चिरलेला कांदा
 • अर्धी वाटी सत्तू (भाजलेल्या चण्याच्या डाळीचे पीठ)
 • 1 वाटी गव्हाचे पीठ

सत्तू पराठा | How to make Sattu Paratha Recipe in Marathi

 1. बाजारातून तयार सत्तू पावडर घ्या किंवा घरी चण्याची डाळ वाटून तयार करा. नंतर एका मोठा वाडग्यात सत्तू पावडरमध्ये गव्हाचे पीठ सोडून सर्व साहित्य घालून नीट मिक्स करा. यात थोडे पाणी घालून बाजूला ठेवा. आता गव्हाच्या पिठात पाणी घालून कणिक मळून घ्या.
 2. तयार केलेल्या कणिकेचे लहान गोळे बनवा आणि त्यांच्या पोळ्या लाटून घ्या. नंतर त्यावर थोडे तेल लावा आणि सत्तूचे मिश्रण ठेवा. आता सत्तुच्या मिश्रणाला आत ठेऊन सर्व कडा गोळा करून बंद करा.
 3. नंतर याला सावकाश पोळीसारखे लाटा. पराठ्याला गरम तव्यावर भाजा, पुरेसे तेल लावा आणि दोन्ही बाजूंनी नीट भाजा. मध्यम आचेवर दोन्ही बाजू होईपर्यंत भाजा.
 4. दही, आलू चटणी किंवा वांग्याच्या चटणीबरोबर गरम गरम वाढा.

Reviews for Sattu Paratha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo