राजस्थानी बेसन भिंडी | Rajasthani Besan Bhindi Recipe in Marathi

प्रेषक Poonam Bachhav  |  26th Nov 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rajasthani Besan Bhindi by Poonam Bachhav at BetterButter
राजस्थानी बेसन भिंडीby Poonam Bachhav
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1944

0

राजस्थानी बेसन भिंडी

राजस्थानी बेसन भिंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajasthani Besan Bhindi Recipe in Marathi )

 • 250 ग्रॅम्स भेंड्या
 • 1/4 वाटी बेसन
 • 2 मध्यम कांदे (चिरलेले)
 • 1/2 लहान चमचा जिरे
 • 1/2 लहान चमचा गरम मसाला
 • 1/4 लहान चमचा हळद
 • 1 लहान चमचा धणेपूड
 • 1 लहान चमचा लाल तिखट
 • अर्धा लहान चमचा बडीशेप
 • अर्धा लहान चमचा आमचूर पावडर
 • 1/4 लहान चमचा हिंग
 • 3 लहान चमचे तूप
 • 1-2 लहान चमचे पाणी (शिडकाव करण्यासाठी)
 • मीठ चवीनुसार

राजस्थानी बेसन भिंडी | How to make Rajasthani Besan Bhindi Recipe in Marathi

 1. भेंडी स्वच्छ करून एका किचन टॉवेलने कोरड्या करा. जर भेंडी ओली राहिली, तर करी चिकट होईल. त्यांच्या लांबीनुसार अर्ध्यापर्यंत काप द्या.
 2. एका नॉनस्टीक पॅनमध्ये तूप घालून गरम करा. त्यात जिरे तडतडवा. नंतर त्यात हिंग आणि कांदा घाला. कांदा परतला की त्यात भेंडी घाला. नीट मिसळा आणि 2-3 मिनिटे शिजू द्या.
 3. मीठ आणि हळद घाला. मिसळा आणि 5-7 मिनिटे शिजू द्या. कुरकूरीत होण्यासाठी मध्यम आचेवर ठेऊन अधून मधून हलवत रहा.
 4. तेल सुटले की त्यात बेसन, जिर, धणेपूड, बडीशेप पावडर, लाल तिखट आणि आमचूर पावडर घाला. सर्व साहित्य नीट मिसळा.
 5. पॅनवर झाकण ठेऊन भेंडी 3-4 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. 3-4 मिनिटानंतर झाकण काढा आणि भेंडीवर थोडे पाणी शिंपडा, ज्यामुळे पॅनला ती चिकटणार नाही. पुन्हा मिसळा आणि 1 मिनिटाने गॅस बंद करा.
 6. गरमगरम वाढा.

My Tip:

आंबट स्वाद येण्यासाठी आमचूर पूड उपलब्ध नसल्यास त्यात लिंबाचा रस घाला. मी या रेसिपीमध्ये कांदे वापरले आहेत. तुम्ही यात कांदे घालणे टाळू शकता आणि ही रेसिपी कांदा-लसूण मुक्त व्यंजन बनू शकेल.

Reviews for Rajasthani Besan Bhindi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo