मुख्यपृष्ठ / पाककृती / दाल बाटी चुरमा (राजस्थानी पाककृती)

Photo of Daal Baati Churma (Rajasthani Cuisine) by Alka Jena at BetterButter
3741
260
4.6(0)
0

दाल बाटी चुरमा (राजस्थानी पाककृती)

Nov-26-2015
Alka Jena
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • राजस्थान
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 5

  1. 1/3 वाटी चणाडाळ
  2. 1/3 वाटी तूरडाळ
  3. 1/3 वाटी मुगाची डाळ
  4. 1 मोठा चमचा उडीदडाळ
  5. 1 मोठा चमचा मसूरची डाळ
  6. 3 लहान चमचे लाल तिखट
  7. 1/4 लहान चमचा हळद
  8. 1 लहान चमचा धणेपूड
  9. अर्धा लहान चमचा गरम मसाला
  10. 2 तमालपत्र
  11. 1 लहान चमचा जिरे
  12. 2 मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  13. एक चिमूटभर हिंग
  14. 2 लहान चमचे आमचूर पावडर
  15. 2 लहान चमचे चिंचेचा गर
  16. 3 मोठे चमचे तूप
  17. मीठ चवीनुसार
  18. बाटी बनविण्यासाठी (12 ते 15 बाटी):
  19. 2 वाटी गव्हाचे पीठ
  20. अर्धी वाटी रवा
  21. 8 मोठे चमचे दूध/पाणी
  22. 4 मोठे चमचे तूप
  23. मीठ चवीनुसार
  24. चुर्म्यासाठी :
  25. एक वाटी गव्हाचे पीठ
  26. 1/4 वाटी रवा
  27. 4 मोठे चमचे पातळ तूप
  28. 1/2 वाटी पिठीसाखर
  29. 2 मोठे चमचे बदाम
  30. 3 लवंगा
  31. तळण्यासाठी तूप

सूचना

  1. सर्व डाळींना चांगले धुऊन त्यात 4 कप पाणी घाला. प्रेशर कुकरमध्ये 2-3 शिट्या करा किंवा डाळी शिजेपर्यंत शिजवा.
  2. एका वाडग्यात लाल तिखट, हळद, धणेपूड, गरम मसाला आणि 3 मोठे चमचे पाणी घालून एकत्र करा. या मिश्रणाला बाजूला ठेवा.
  3. एका पॅनमध्ये तूप गरम करा, त्यात लवंग, तमालपत्र, जिरे, हिरव्या मिरच्या आणि हिंग घाला. जिरे तडतडायला लागले की अगोदर तयार केलेले मसाल्याचे मिश्रण घाला आणि 1-2 मिनिटे परता.
  4. नंतर त्यात शिजलेली डाळ, आमचूर, चिंचेच गर आणि मीठ घालून 5 ते 7 मिनिटे शिजवा. वाढण्यागोदर डाळीची एकजिनसीपणा पहा आणि आवश्यक असल्यास त्यात थोडे पाणी घाला.
  5. बाटी बनविण्यासाठी : याचे सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळा. पीठ 5 ते 7 मिनिटे मळा.
  6. नंतर पीठाचे 10-15 एकसमान गोलाकार गोळे बनवा. अंगठ्याच्या मदतीने गोळ्यांना थोडे सपाट करा आणि चाकूने एक काप करा.
  7. ओवनला 250 अंश सेल्सियसवर 10-15 मिनिटे प्रीहीट करा.
  8. बेकिंग ट्रेला तेल लावा आणि त्यात बाटी ठेवा आणि 230 अंश सेल्सियसवर 12 ते 15 मिनिटे भाजा, 10 मिनिटांनंतर बाटी पलटवा आणि सर्व बाजूंनी बाटी शिजल्या आहेत की नाही ते तपासा.
  9. शिजल्यानंतर देखील बाटी 5 मिनिटे ओव्हनमध्ये राहू द्या.
  10. नंतर या बाट्या काढून साजूक तुपात बुडवून वाढा. (जर तुपात बुडवायच्या नसतील, तर वरून थोडे थोडे तूप लाऊ शकता)
  11. चूर्मा बनविण्यासाठी:
  12. पीठ, रवा आणि तूप एकत्र करून 1/4 पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. नंतर 15-20 मिनिटे झाकून बाजूला ठेवा.
  13. नंतर पीठाचे 10-12 एकसारखे गोळे करा आणि मंद आचेवर गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळा. नंतर काढून किचन टॉवेलवर ठेवा आणि थंड होऊ द्या.
  14. थंड झाल्यावर यांना मिक्सरमध्ये बारीक वाटून पावडर बनवून घ्या आणि त्यात पिठीसाखर घाला. चिरलेले बदाम घाला.
  15. आता बनविलेल्या बाट्या ताटात ठेवा. त्यावर डाळ घाला, थोडा चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला आणि चुर्म्यासह गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर