मुख्यपृष्ठ / पाककृती / कॅरट अँड ओट मफिन्स

Photo of Carrot and Oat Muffins by Tasneem Rajkotwala at BetterButter
2008
179
4.6(0)
0

कॅरट अँड ओट मफिन्स

Jul-21-2015
Tasneem Rajkotwala
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ - दीड वाटी
  2. खाण्याचे ओट्स - 1 वाटी (भरडलेले किंवा जाड दळलेले)
  3. खाण्याचे तेल - 1/2 कप
  4. अंडी - 3 मोठी (सामान्य तापमानावरील)
  5. गाजर - 2 वाट्या किसलेले
  6. व्हॅनिला इसेन्स - 1 मोठा चमचा
  7. पांढरी साखर - 1 वाटी किंवा त्याहून कमी.
  8. खाण्याचा सोडा - 1 लहान चमचा
  9. बेकिंग पावडर - 1 लहान चमचा
  10. मीठ - 1/4 लहान चमचा
  11. वाटलेली दालचिनी - 1/4 लहान चमचा

सूचना

  1. मफिनच्या पॅनला तेल लावा किंवा कागदाचे तयार मफीन कप ठेवा. तुमचे ओव्हन 180 सेल्सियसवर प्रीहीट करा. एक वाडगा घ्या आणि सर्व कोरडी सामग्री मिसळा आणि एक मोठ्या वाडग्यात तेल आणि साखर एकजीव करा.
  2. त्यात एक एक करून अंडी आणि व्हॅनिला इसेन्स घालून व्यवस्थित हलवा. आता कोरडी सामग्री त्यात मिसळा आणि एकजीव होईपर्यंत हलवा.
  3. त्यात गाजर मिसळा, परंतु जास्त मिसळणार नाही याची खात्री करा. तयार केलेल्या मफीन ट्रेमध्ये घालून 20-25 मिनिटांसाठी किंवा केक टेस्टर स्वच्छ बाहेर येईपर्यंत बेक करा.
  4. ओव्हनमधून काढा आणि गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर