मूग डाळ हलवा | Moong Dal Halwa Recipe in Marathi

प्रेषक Farrukh Shadab  |  30th Nov 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Moong Dal Halwa by Farrukh Shadab at BetterButter
मूग डाळ हलवा by Farrukh Shadab
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1926

0

मूग डाळ हलवा recipe

मूग डाळ हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong Dal Halwa Recipe in Marathi )

 • चांदीचा वर्ख / कागद ( ऐच्छिक )
 • स्लाईस केलेले बदाम
 • सुक्या गुलाब पाकळ्या ( ऐच्छिक )
 • थोडेसे केशर
 • सजविण्यासाठी :
 • बारीक केलेले काजू व बदाम गरजेनुसार
 • 1 टेबल स्पून वेलदोडे पावडर
 • एक चिमुट केशर
 • 300 ग्रॅम साखर ( आपण गोडीनुसार कमी / जास्त करू शकता )
 • 300 ग्रॅम तूप
 • 4 कप मलाई सहित दूध
 • 250 ग्रॅम धुतलेली मूग डाळ ( साले नसलेले हिरवे हरभरे अर्धे करावेत )

मूग डाळ हलवा | How to make Moong Dal Halwa Recipe in Marathi

 1. मूग डाळ साफ करून स्वच्छ धुवावी आणि 6-7 तास भिजवून ठेवावी . 1/4 कप गरम दुधामध्ये केशर भिजवून बाजूला ठेवावे . मूग डाळ पाण्यातून काढून त्याची पाण्याशिवाय भरडसर दळून पेस्ट करुन घ्यावी.
 2. जाड तळाच्या पॅन किंवा कढईत तूप व मूग डाळ पेस्ट घालून मिसळून घ्यावे. डाळ सौम्य सोनेरी तांबूस होईपर्यंत शिजवावी . अधून मधून हलवत रहावे.
 3. डाळ सोनेरी तांबूस झाल्यावर त्यात 4 कप दूध घालून चांगले मिसळून घ्यावे. मध्यम आचेवर 3/4 दूध आटेपर्यंत शिजू द्यावे. अधून मधून हलवत रहावे. त्यात वेलदोडे पावडर, साखर, दुधामध्ये भिजवलेले केशर , बारीक तुकडे केलेले काजू व बदाम टाकावेत. चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.
 4. आता भुनो - फ्राईंग ( मंद आंचेवर शिजवणे ) , हलवा छानपैकी गडद तांबूस रंगाचा आणि त्यातून तूप निघून पॅनमध्ये येईपर्यंत सातत्याने हलवत रहावे.
 5. खायला द्यायच्या बाऊलमध्ये डीश तयार करावी , ती स्लाईस केलेले बदाम, गुलाब, केशर घालून गरम करावी.
 6. गरम खायला द्यावे. हा हलवा मोठ्या प्रमाणावर बनवून स्वच्छ व सुक्या हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये 3 आठवड्यापर्यंत ठेवू शकता. त्यावेळी आवश्यक तेवढा भाग पुन्हा गरम करून कधीही त्याचा आनंद घेऊ शकता.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Moong Dal Halwa Recipe in Marathi (0)