मलाई कोफ्ता | Malai Kofta Recipe in Marathi

प्रेषक Rashmi Krishna  |  2nd Dec 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Malai Kofta by Rashmi Krishna at BetterButter
मलाई कोफ्ता by Rashmi Krishna
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

7879

0

मलाई कोफ्ता recipe

मलाई कोफ्ता बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Malai Kofta Recipe in Marathi )

 • पनीर - 150 ग्रॅम्स (मी घरी बनविलेले वापरले)
 • टोमॅटो - 3 (चिरलेले)
 • काजू - 1/2 वाटी
 • कलिंगडच्या बिया - 1/4 वाटी
 • खसखस - 1 लहान चमचा (इच्छेनुसार)
 • आले-लसणाची पेस्ट - 2 लहान चमचे
 • हिरवे वेलदोडे - 2
 • लाल तिखट 1 लहान चमचा
 • मीठ स्वादानुसार
 • तेल 1 मोठा चमचा
 • दही - 1/4 कप
 • मैदा - 2 लहान चमचे
 • ताजी साय - 2 मोठे चमचे
 • गरम मसाला - 1 लहान चमचा
 • सजविण्यासाठी : ताजी कोथंबीर

मलाई कोफ्ता | How to make Malai Kofta Recipe in Marathi

 1. प्रेशर कुकरमध्ये टोमॅटो, काजू, कलिंगडाच्या बिया, खसखस, आले, हिरवे वेलदोडे, लाल तिखट, मीठ आणि 1 मोठा चमचा तेल घालून शिजवा (1 शिटी पुरेशी आहे)
 2. हे मिश्रण थंड झाल्यावर ब्लेंडरच्या मदतीने वाटून घ्या. दही घालून चांगले मिसळा. ते मिश्रण एक बाजूला ठेवा.
 3. एका वाडग्यात पनीर कुस्करा. त्यात हिरव्या वेलदोड्याची पूड, मीठ आणि मैदा घालून एकजीव करा . याचे लहान लहान गोल/कोफ्ते बनवा.
 4. एका कढईत पुरेसे तेल घेऊन कोफ्ते तळा. अतिरिक्त तेल निघून जाण्यासाठी त्यांना टिश्यू पेपरवर ठेवा.
 5. मिश्रणाला गाळणीने गाळून एका कढईत टाका आणि उकळू द्या. एक उकळी आल्यानंतर त्यात गरम मसाला आणि साय घाला.
 6. वाढायला घेणाऱ्या वाडग्यात तळलेले कोफ्ते ठेवा. (मी त्यावर थोडा चाट मसाला शिंपडते आणि नंतर त्यावर रस्सा घालते) वाढण्याअगोदर पुन्हा आणखी थोड्या सायीने सजवा.
 7. शेवटी कोथंबिरीने सजवा आणि गरमागरम वाढा.

My Tip:

घरगुती पनीर नेहमी चांगले असते आणि त्याचा पोत या डिशसाठी एकदम अचूक असतो. मी काहीवेळा कोफ्तांमध्ये ब्रेड क्रम्स देखील घालते.

Reviews for Malai Kofta Recipe in Marathi (0)