मुख्यपृष्ठ / पाककृती / मलाई कोफ्ता

Photo of Malai Kofta by Rashmi Krishna at BetterButter
5944
923
4.5(0)
0

मलाई कोफ्ता

Dec-02-2015
Rashmi Krishna
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मलाई कोफ्ता कृती बद्दल

जेव्हा माझ्या घरी जेव्हा पाहुणे येतात आणि ते शाकाहारी असतात, तेव्हा ही डिश मी रात्रीच्या जेवणासाठी बनविते कारण ते विशेष करून पनीर पसंत करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • युपी
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर - 150 ग्रॅम्स (मी घरी बनविलेले वापरले)
  2. टोमॅटो - 3 (चिरलेले)
  3. काजू - 1/2 वाटी
  4. कलिंगडच्या बिया - 1/4 वाटी
  5. खसखस - 1 लहान चमचा (इच्छेनुसार)
  6. आले-लसणाची पेस्ट - 2 लहान चमचे
  7. हिरवे वेलदोडे - 2
  8. लाल तिखट 1 लहान चमचा
  9. मीठ स्वादानुसार
  10. तेल 1 मोठा चमचा
  11. दही - 1/4 कप
  12. मैदा - 2 लहान चमचे
  13. ताजी साय - 2 मोठे चमचे
  14. गरम मसाला - 1 लहान चमचा
  15. सजविण्यासाठी : ताजी कोथंबीर

सूचना

  1. प्रेशर कुकरमध्ये टोमॅटो, काजू, कलिंगडाच्या बिया, खसखस, आले, हिरवे वेलदोडे, लाल तिखट, मीठ आणि 1 मोठा चमचा तेल घालून शिजवा (1 शिटी पुरेशी आहे)
  2. हे मिश्रण थंड झाल्यावर ब्लेंडरच्या मदतीने वाटून घ्या. दही घालून चांगले मिसळा. ते मिश्रण एक बाजूला ठेवा.
  3. एका वाडग्यात पनीर कुस्करा. त्यात हिरव्या वेलदोड्याची पूड, मीठ आणि मैदा घालून एकजीव करा . याचे लहान लहान गोल/कोफ्ते बनवा.
  4. एका कढईत पुरेसे तेल घेऊन कोफ्ते तळा. अतिरिक्त तेल निघून जाण्यासाठी त्यांना टिश्यू पेपरवर ठेवा.
  5. मिश्रणाला गाळणीने गाळून एका कढईत टाका आणि उकळू द्या. एक उकळी आल्यानंतर त्यात गरम मसाला आणि साय घाला.
  6. वाढायला घेणाऱ्या वाडग्यात तळलेले कोफ्ते ठेवा. (मी त्यावर थोडा चाट मसाला शिंपडते आणि नंतर त्यावर रस्सा घालते) वाढण्याअगोदर पुन्हा आणखी थोड्या सायीने सजवा.
  7. शेवटी कोथंबिरीने सजवा आणि गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर