राईस इडली | Rice Idlis Recipe in Marathi

प्रेषक Bindiya Sharma  |  4th Dec 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rice Idlis by Bindiya Sharma at BetterButter
राईस इडली by Bindiya Sharma
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3091

0

Video for key ingredients

 • Sambhar Powder

 • How to make Idli/Dosa Batter

राईस इडली recipe

राईस इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice Idlis Recipe in Marathi )

 • दीड वाटी तांदूळ
 • अर्धी वाटी उडीदडाळ
 • 1 लहान चमचा मेथी
 • जाड पोहे - 1/4 वाटी
 • मीठ चवीनुसार

राईस इडली | How to make Rice Idlis Recipe in Marathi

 1. डाळ, तांदूळ आणि मेथीला वेगवेगळे रात्रभर भिजत घाला.
 2. पोहे एक तास अगोदर भिजवा.
 3. दुसऱ्या दिवशी वाटून घ्या. अगोदर मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून मेथी वाटून घ्या. पोहे घालून पुन्हा वाटा.
 4. आता डाळीला गाळा आणि अर्धा कप पाणी घालून धुवा आणि वाटा (आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला).
 5. यानंतर मिश्रण थोडे फुललेले दिसेल, तेव्हा यात भिजवलेले तांदूळ आणि थोडे पाणी घालून वाटा. हे मिश्रण थोडे घट्ट झाले पाहिजे.
 6. आता मिश्रणाला अॅल्युमिनियमच्या एखाद्या भांड्यात काढा. त्यात मीठ घाला.
 7. याला आंबवण्यासाठी 7-8 तास झाकून ठेवा.
 8. इडलीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाल्यावर, इडलीच्या साच्याला थोडे तूप लावा आणि मोठ्या चमच्याने साचा पूर्ण भरा.
 9. इडलीच्या भांड्यात पाणी उकळावा. त्यत इडलीचा साचा ठेवा आणि मोठ्या आचेवर 10 मिनिटे वाफेवर इडल्या होऊ द्या.
 10. नंतर आच बंद करून 5 मिनिटानंतरच इडल्या काढा.
 11. इडलीला सांबार आणि नारळाच्या चटणीबरोबर गरमग्रम वाढा.

Reviews for Rice Idlis Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo