मुख्यपृष्ठ / पाककृती / पुदिन्याच्या चटणीसह पालक उत्तपम

Photo of Spinach Uttapam with Mint chutney by Mehak Joshi at BetterButter
4490
275
4.6(0)
0

पुदिन्याच्या चटणीसह पालक उत्तपम

Dec-09-2015
Mehak Joshi
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • तामिळ नाडू
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 8 ब्रेडचे काप (कोणत्याही प्रकारचा)
  2. 4 मोठे चमचे रवा
  3. 4 मोठे चमचे ओट्स पावडर
  4. 1 मोठा चमचा मैदा
  5. 1 कप कच्च्या पालकाचा रस
  6. 1 लहान चमचा मिरे
  7. अर्धा बारीक चिरलेला कांदा.
  8. अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो
  9. 1 मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर
  10. पुदिन्याच्या चटणीसाठी : 1 लहान कांदा
  11. 1 लहान टोमॅटो
  12. 1 इंच आले
  13. 1 लसणाच्या पाकळ्या
  14. 2 वाट्या ताजी पुदिन्याची पाने
  15. 2 हिरव्या मिरच्या
  16. 1 लहान चमचा साखर
  17. 1 लहान चमचा आमचूर पावडर (ऐच्छिक)
  18. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पुदिन्याची चटणी बनविण्यासाठी सांगितलेले सर्व साहित्य एकत्र करून थोडे पाणी घालून जाडेभरडे वाटून घ्या आणि चवीनुसार मीठ घाला, आणि बाजूला ठेवा.
  2. उत्तपम बनविण्यासाठी : एका मोठ्या कुकी कटर किंवा एका ग्लासच्या मदतीने ब्रेडला गोलाकार कापून घ्या. अशा प्रकारे ब्रेडला कापून कडा काढून टाका.
  3. ओट्स पावडर बनविण्यासाठी ओट्स एका गरम पॅनमध्ये कोरडे भाजा आणि ते थंड झाल्यावर दळून घ्या. या पावडरला एका हवाबंद डब्यात ठेवा. एका मोठ्या वाडग्यात रवा, मैदा, ओट्स पावडर, पालकाचा रस, मिरे, मीठ सर्व एकत्र करून मिसळा.
  4. या मिश्रणाचे जाड पेस्ट बनवा. जर मिश्रण अधिक जाड वाटले, तर त्यात एक मोठा चमचा पाणी किंवा दही घाला.
  5. आता एक नॉनस्टीक पॅन गरम करा आणि त्यावर थोडे तेल शिंपडा. याला मंद आचेवर ठेवा.
  6. ब्रेडच्या एका गोलाकार तुकड्यावर 1 किंवा 2 लहान चमचे हिरवे मिश्रण पसरवा. आता त्यावर थोडा कांदा आणि टोमॅटो घाला. ब्रेडची बाजू खाली करत ते पॅनवर ठेवा.
  7. जेव्हा ब्रेड खालून बदामी आणि कुरकुरीत झाला की एका उलथन्याच्या मदतीने काळजीपूर्वक पलटवा. थोडा वेळ किंवा हिरवे मिश्रण शिजेपर्यंत शिजवा.
  8. पॅनला चिकटू नये त्यासाठी थोडे ऑलिव्हचे तेल घाला. उरलेले सारे ब्रेड याचप्रमाणे करा आणि त्यांना कोथिंबीरीने सजवा.
  9. गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर