तीन थराचा सँडविच ढोकळा | Three layered Sandwich Dhokla Recipe in Marathi

प्रेषक Jagruti D  |  9th Dec 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Three layered Sandwich Dhokla recipe in Marathi,तीन थराचा सँडविच ढोकळा , Jagruti D
तीन थराचा सँडविच ढोकळा by Jagruti D
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3110

0

तीन थराचा सँडविच ढोकळा recipe

तीन थराचा सँडविच ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Three layered Sandwich Dhokla Recipe in Marathi )

 • 2 वाट्या तांदूळ (कोणतेही)
 • 1 वाटी उडदाची डाळ
 • मीठ स्वादानुसार
 • चिमूटभर खाण्याचा सोडा.
 • 1 लहान चमचा तेल
 • चिमूटभर सायट्रिक एसिड
 • अर्धी वाटी कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी
 • 1/4 वाटी लसणाची चटणी + 2 लहान चमचे गूळ घेऊन दोन्ही व्यवस्थित मिसळा
 • चण्याची डाळ सारण म्हणून:
 • अर्धी वाटी शिजलेली चण्याची डाळ
 • 1 मोठा चमचा तेल
 • 1 मोठा चमचा वाटलेल्या मिरच्या आणि आले
 • मीठ स्वादानुसार
 • 1 लहान चमचा गरम मसाला
 • 1 लहान चमचा लिंबाचा रस
 • अर्धा लहान चमचा हळद
 • अर्धा लहान चमचा मोहरी
 • फोडणीसाठी:
 • 2-3 मोठे चमचे तेल
 • 1 मोठा चमचा मोहरी
 • चिमूटभर हिंग
 • 2-3 मोठे चमचे सजविण्यासाठी ताजी कोथिंबीर

तीन थराचा सँडविच ढोकळा | How to make Three layered Sandwich Dhokla Recipe in Marathi

 1. मिश्रण बनविण्यासाठी: तांदूळ आणि डाळसाफ करा आणि 8 - 10 तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमध्ये डाळ आणि तांदूळ वाटून घ्या (इडलीच्या मिश्रणासारखे) आणि दोन्ही व्यवस्थित मिसळा व एका उबदार जागेवर आंबविण्यासाठी ठेवा. (माझ्या मिश्रणाला जवळजवळ 24 तास लागले)
 2. चणाडाळीच्या सारणासाठी: एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की त्यात आले आणि मिरची घालून काही सेकंद परता. नंतर त्यात शिजवलेली चणाडाळ घाला. इतर मसाले सुध्दा घाला आणि काही मिनिटांसाठी शिजवा. लिंबाचा रस घालून गॅस बंद करा.
 3. सँडविच ढोकळा बनविण्यासाठी: एका वाडग्यात मिश्रण घ्या आणि त्यात तेल, सायट्रिक एसिड आणि सोडा आणि थोडे पाणी घालून नीट मिसळा. जर मिश्रण जाड झाले असेल, तर पुन्हा थोडे पाणी घाला. एक मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा.
 4. मिश्रण पुनः एकदा व्यवस्थित हलवा आणि खोल ताटात थोडे तेल लाऊन त्यात पातळ थर करा. त्याला पाण्यावर 15-20 मिनिटे वाफवा. चाकू घालून तपासा, जर चाकू स्वच्छ बाहेर आला, तर समजा ते शिजले आहेत. थोडेसे थंड होण्यासाठी ठेवा.
 5. अशा प्रकारे ढोकळ्याची आणखी एक प्लेट तयार करून घ्या. नंतर एका धारदार चाकूने दोन्ही ढोकळ्यांना मध्य भागातून कापा. याने तुम्हाला अर्धचंद्राच्या आकाराचे एकूण चार तुकडे मिळतील.
 6. नंतर हळू हळू दोन्ही अर्धगोलाकार ढोकळे ताटातून काढून घ्या. याचप्रमाणे दुसऱ्या ढोकळ्याच्या ताटाला सुद्धा करा. आता तुमच्याकडे अर्धगोलाकार ढोकळ्यांचे 4 काप आहेत.
 7. आता एक तुकड्याला सपाट ताट किंवा भाजी कापावयाच्या लाकडाच्या बोर्डवर ठेवा, ढोकळ्याचा खडबडीत भाग वरच्या बाजूस ठेवा. यावर हिरवी चटणी लावा. नंतर त्याच्या वर ढोकळ्याचा दुसरा काप ठेवा.
 8. त्याला लाटण्याने हळूवारपणे लाटा, आता त्यावर चणाडाळीचे सारण ठेवा. त्यावर ढोकळ्याचा तिसरा काप ठेवा आणि पुन्हा एकदा लाटण्याने हळू लाटा
 9. आता त्यावर लसणाची चटणी लावा. शेवटी ढोकळ्याचा चवथा काप ठेवा आणि आत लावलेले घटक बाहेर येऊ नये म्हणून लाटण्याने हळूहळू लाटा.
 10. आता या थर लावलेल्या ढोकळ्यांचे धारदार चाकूने चौरस काप करा. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घाला. ती तडतडायला लागली की त्यात हिंग घाला.
 11. आणि संपूर्ण ढोकळ्यांच्या कापांवर ही तयार फोडणी घाला. शेवटी त्यावर कोथिंबीर पसरा आणि चहाबरोबर त्याचा आस्वाद घ्या.

Reviews for Three layered Sandwich Dhokla Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती