मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्च्या केळींची कोफ्ता करी

Photo of Kachche kela ka kofta curry by Sujata Limbu at BetterButter
2472
305
4.5(0)
1

कच्च्या केळींची कोफ्ता करी

Dec-23-2015
Sujata Limbu
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • राजस्थान
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. कोफ्ता बनविण्यासाठीचे साहित्य:
  2. 2 नग कच्ची केळी (उकडून कुस्करलेली)
  3. 1 लहान कांदा (बारीक चिरलेला)
  4. 1/4 लहान चमचा मिरपूड
  5. अर्धा लहान चमचा लाल तिखट
  6. अर्धा लहान चमचा आले (ठेचलेले)
  7. 2 हिरव्या मिरच्या (ठेचलेल्या)
  8. मीठ चवीनुसार
  9. तळण्यासाठी तेल, आवश्यकतेनुसार
  10. इतर साहित्य:
  11. 2 लहान कांदे (बारीक चिरलेले)
  12. 130 मिली टोमॅटो प्युरी
  13. 1 लहान चमचा लाल तिखट
  14. अर्धा लहान चमचा हळद
  15. 3 वेलदोडे
  16. 3 लवंगा
  17. 1 दालचिनीचा तुकडा
  18. 1 लहान चमचा मध
  19. 2 लहान चमचे दूध
  20. चिमूटभर साखर
  21. 50 मिली ताजी साय
  22. 50 मिली तूप

सूचना

  1. कोफ्त्यासाठी सांगितलेले साहित्य एका वाडग्यात एकत्र करा. हे मिश्रण 10-12 भागात वाटा आणि त्याला कोफ्त्याचा आकार द्या. आणि बाजूला ठेवा.
  2. एका कढईत तेल गरम करा, आणि कोफ्ते बदामी रंगाचे होईपर्यंत तळा. नंतर एका पेपर टॉवेलवर तेल निथळण्यासाठी काढून ठेवा. ज्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल.
  3. एका दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात वेलदोडे, लवंगा आणि दालचिनी आणि मसाले घाला.
  4. मसाला झाला की त्यात हळद आणि बारीक चिरलेला कांदा घाला. मिश्रण 2-3 मिनिटे बदामी होईपर्यंत परता.
  5. नंतर, त्यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. हलवा आणि नंतर त्यात टोमॅटो प्युरी घाला आणि 3-4 मिनिटे हळू-हळू शिजू द्या.
  6. नंतर साय आणि दूध घालून हलवा, ज्यामुळे सर्व साहित्य एकजीव होईल. पुन्हा 2-3 मिनिटे हळू-हळू शिजवा. रस्सा आचेवरून खाली उतरवा, त्यात मध आणि साखर घालून नीट हलवा.
  7. ताटात कोफ्ता ठेवा आणि त्यावर रस्सा घाला. भाताबरोबर या कोफ्ता करीला गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर