मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेजीटेबल कटलेट

Photo of Vegetable Cutlets by Sharon Dcosta at BetterButter
2277
132
4.7(0)
0

व्हेजीटेबल कटलेट

Dec-26-2015
Sharon Dcosta
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेजीटेबल कटलेट कृती बद्दल

नेहमीच्या व्हेजीटेबल कटलेटमध्ये वेगळेपण, यात भाज्या आहेत आणि याला सोया सॉसचा उग्र वास देखील आहे. हे खायच्या सुरवातीला किंवा भात व रश्श्याबरोबर खायला देता येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप उकडून लगदा केलेले बटाटे
  2. 1/4 कप गाजर ( बारीक चिरलेले )
  3. 1/4 कप कांदा ( बारीक चिरलेला )
  4. 1/4 कप फ्रेंच बीन्स ( बारीक चिरलेले )
  5. 1 टेबल स्पून सोया सॉस
  6. 1 टेबल स्पून तेल
  7. चवीनुसार मीठ
  8. 1/4 कप आटा
  9. 1 कप ब्रेड क्रम्बज
  10. 3 टेबल स्पून हरभरा पीठ ( बेसन )

सूचना

  1. पॅनमध्ये तेल गरम करावे, त्यात कांदा, गाजर व फ्रेंच बीन्स सोबत थोडे मीठ घालून परतावे.
  2. गरज वाटली तर थोडे पाणी टाकून भाज्या मऊ होईपर्यंत शिजवाव्यात. थोडे सोया सॉस घालून चांगले मिसळून घ्यावे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवावे.
  3. एका बाऊलमध्ये लगदा केलेले बटाटे व शिजलेल्या भाज्या घ्याव्यात. चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे आणि त्याचे गोळे करावेत. त्याला हाताने दाबून सपाट करावे.
  4. एका छोट्या बाऊलमध्ये हरभरा पिठात पाणी घालून त्याचे बॅटर तयार करावे.
  5. कटलेट पीठामध्ये घोळवून हरभरा बॅटरमध्ये बुडवावे आणि ब्रेड क्रम्बजमध्ये रोल करावेत .
  6. सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळावे आणि पुदिन्याची चटणी व टोमॅटो केचप बरोबर खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर