मुख्यपृष्ठ / पाककृती / अमृतसरी दाल मखनी

Photo of Amritsari Dal Makhani by Ritu Sharma at BetterButter
10252
1066
4.7(0)
3

अमृतसरी दाल मखनी

Jul-23-2015
Ritu Sharma
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • पंजाबी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 3/4 कप उडीदडाळ
  2. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
  3. 2 मोठे अगदी बारीक चिरलेले टोमॅटो
  4. अर्धी वाटी ताजी साय
  5. 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  6. 1 मोठा चमचा तूप
  7. 1 मोठा चमचा तेल
  8. 1 मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर
  9. 2 मोठे चमचे आले-लसणाची पेस्ट
  10. अर्धा लहान चमचा लाल तिखट
  11. अर्धा लहान चमचा कैरी पावडर
  12. अर्धा लहान चमचा धणेपूड
  13. अर्धा लहान चमचा गरम मसाला
  14. अर्धा लहान चमचा हळद
  15. अर्धा लहान चमचा जिरे
  16. 1 इंच चिरलेले आले
  17. पाणी आवश्यकतेनुसार
  18. मीठ चवीनुसार

सूचना

  1. रात्रभर उडीदडाळ भिजवून ठेवा. त्यातून अतिरिक्त पाणी गाळून घ्या.
  2. प्रेशर कुकरमध्ये डाळ, अर्धी वाटी कांदा, आले, मीठ आणि अडीच कप पाणी घालून 15-20 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
  3. वाफ निघाल्यानंतर डाळीत साय घाला. नंतर त्याला आणखी 10 मिनिटे शिजवा.
  4. दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करा. नंतर त्यात उरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घाला. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता.
  5. टोमॅटो घाला आणि तेल सुटेपर्यंत शिजवा.
  6. लाल तिखट, हळद, कैरी पावडर, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ घालून 2-3 मिनिटे शिजवा.
  7. डाळीला फोडणी द्या आणि आणखी 5 मिनिटे शिजवा.
  8. साय आणि लोण्याने सजवा आणि पोळीबरोबर वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर