पनीर बटर मसाला | Paneer Butter Masala Recipe in Marathi

प्रेषक Pavithira Vijay  |  20th Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Paneer Butter Masala by Pavithira Vijay at BetterButter
पनीर बटर मसाला by Pavithira Vijay
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

8804

0

पनीर बटर मसाला recipe

पनीर बटर मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer Butter Masala Recipe in Marathi )

 • 1-2 टेबल स्पून ताजी मलाई
 • 1/4 टी स्पून कुस्करलेली कसुरी मेथी
 • 1 टी स्पून गरम मसाला
 • 3/4 टी स्पून साखर
 • गरजेनुसार मीठ
 • एक चिमुट हळद
 • 1 टी स्पून धणे पावडर
 • 1 1/2 टी स्पून लाल मिरची पावडर ( किंवा चवीनुसार )
 • 6-7 काजू ( भिजवून दळलेले )
 • 3-4 मध्यम आकाराचे टोमॅटो ( प्युरी केलेले )
 • 1 टी स्पून आल्ले लसूण पेस्ट
 • 1 मध्यम आकाराचा कांदा ( दळून पेस्ट केलेला )
 • 2 जायपत्री
 • 3 हिरवे वेलदोडे
 • 3 लवंगा
 • 1 टी स्पून तेल
 • 2 टेबल स्पून बटर
 • 225 ग्रॅम पनीर ( काॅटेज चीज )

पनीर बटर मसाला | How to make Paneer Butter Masala Recipe in Marathi

 1. पॅनमध्ये बटर लावून ते तेलकट करून घ्यावे आणि पनीरवर सोनेरी छटा येईपर्यंत आणि पनीर मऊ होईपर्यंत हलके तळून घ्यावे, पनीर उलटून दुसर्‍या बाजूने तसेच करून घ्यावे आणि पनीरचे छोटे तुकडे करून गरज लागेपर्यंत बाजूला ठेवावे.
 2. त्याच पॅनमध्ये आणखी बटर व थोडे तेल टाकावे, बटर वितळल्यावर त्यात वेलदोडे, लवंगा आणि जायपत्री घालावी. त्यामध्ये कांद्याची पेस्ट , आल्ले - लसूण पेस्ट घालून परतायला सुरवात करावी.
 3. कांद्याची पेस्ट चांगली परतल्यावर सोनेरी तांबूस रंग यायला सुरुवात होते, त्यात टोमॅटो प्युरी मिसळावी.
 4. झाकण लावून 2-3 मिनिटे शिजवावे आणि त्यामध्ये सर्व मसाला पावडरी टाकाव्यात ( गरम मसाला सोडून ).
 5. ते तोपर्यंत शिजू द्यावे, टोमॅटो जोपर्यंत पूर्ण शिजत नाहीत आणि पेस्ट कमी होत नाही आणि तेल बाहेर पडत नाही तोपर्यंत शिजवावे.
 6. आता त्यात कपभर पाणी घालून ते उकळू द्यावे.
 7. त्यामध्ये काजू पेस्ट घालून चांगले ढवळावे , आणखी 3-4 मिनिटे शिजवावे.
 8. आता त्यामध्ये साखर घालून त्यावर गरम मसाला पसरावा,मग कुस्करलेली कसुरी मेथी घालून चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे.
 9. त्यामध्ये तळलेले पनीरचे तुकडे टाकावेत आणि पनीरला मसाल्याचा स्वाद शोषून घेण्यासाठी मध्यम - मंद आचेवर 3-4 मिनिटे शिजू द्यावे.
 10. आता आंच मंद करावी, त्यात मलाई घालून मिसळून घ्यावे. 2 मिनिटांनी स्टोव्ह बंद करावा.
 11. खायला द्यायच्या बाऊलमध्ये शिजवलेला पनीर बटर मसाला घ्यावा, त्यावर आणखी मलाई घालून सजवावे आणि खायला द्यावे.

My Tip:

तुम्ही काजू पेस्ट ऐवजी बदामाची पेस्ट किंवा कलिंगडाच्या बियांची पेस्ट वापरू शकता. साखरेमुळे चव आणि टोमॅटोच्या आंबटपणाचे संतुलन होत असते. पनीर शॅलो फ्राय करणे हे ऐच्छिक आहे, तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता, परंतु मी आपल्याला ते न करण्याचा सल्ला देईन. किंवा साॅस तयार करेपर्यंत पनीर गरम पाण्यात भिजवावे. ही सगळ्यात योग्य पद्धत आहे .

Reviews for Paneer Butter Masala Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo