BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Palak Paneer !

Photo of Palak Paneer ! by Pavithira Vijay at BetterButter
312
1030
0(0)
1

पालक पनीर

Jan-21-2016
Pavithira Vijay
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनीर कृती बद्दल

आरोग्यपूर्ण प्रथिने व लोहाचे काॅम्बो, मलाईदार व स्वादिष्ट हिरव्या पालकाच्या रश्यात मऊ पनीर.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • नॉर्थ इंडियन
 • सिमरिंग
 • ब्लेंडींग
 • बॉइलिंग
 • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

 1. 2 जुड्या पालक
 2. 350 ग्रॅम पनीर
 3. 1 मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला) कांदा
 4. 2 टोमॅटोची प्युरी
 5. 2 हिरव्या मिरच्या
 6. 1-2 मोठे चमचे तेल
 7. 1 लहान चमचे जीरे
 8. 2-3 लवंगा
 9. एक चिमुट हिंग
 10. 1 मोठा चमचा आले - लसणाची पेस्ट
 11. गरजेनुसार मीठ
 12. 1 लहान चमचा लाल मिरची पावडर
 13. 1/4 लहान चमचा हळद पावडर
 14. 1 लहान चमचा धणे पावडर
 15. 1 लहान चमचा गरम मसाला
 16. 3/4 लहान चमचा साखर
 17. 1 लहान चमचा कुस्करलेली कसुरी मेथी (सुकविलेली मेथी)
 18. 2 मोठे चमचे ताजी साय (इच्छेनुसार)

सूचना

 1. पालकाची पाने देठापासून वेगळी करावीत आणि स्वच्छ धुवून घ्यावी. थोडे पाणी उकळून घ्यावे, पालकाची पाने त्यात 2-3 मिनिटे ठेवावीत आणि पाने आकसू लागल्यावर आंच बंद करावी, पाण्यातून पाने काढावीत आणि पाणी नंतर वापरण्यासाठी बाजूला ठेवावे.
 2. पालक थंड झाल्यावर त्यात हिरव्या मिरच्या घालून त्याची प्युरी बनवावी.
 3. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, हिंग व लवंगा टाकाव्यात, नंतर त्यात चिरलेला कांदा व आले, लसणाची पेस्ट घालावी. मंद आचेवर चांगले परतून घ्यावे .
 4. कांदा मऊ झाल्यावर आणि व्यवस्थित परतल्यावर त्यात मसाला पावडर (गरम मसाला सोडून) व मीठ घालून चांगले तळून घ्यावे, जास्त कोरडे वाटल्यास थोडेसे पाणी शिंपडा.
 5. मसाला चांगला शिजल्यावर टोमॅटो प्युरी टाकावी आणि कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आणि मिश्रणातून तेल बाहेर पडेपर्यंत शिजू द्यावे. पुन्हा थोडे पाणी टाकून उकळी येऊ द्यावी.
 6. त्यानंतर त्यात पालक प्युरी व साखर टाकावी आणि व्यवस्थित मिसळून घ्यावे. रस्सा 1-2 मिनिटे शिजवून घ्यावा आणि गरम मसाला टाकून एकजीव करून घ्यावे.
 7. रस्सा तयार करीत असताना दुसरीकडे पनीर कोमट पाण्यात 5-10 मिनिटे भिजवून ठेवावे. त्यानंतर पनीरचे तुकडे काढून सरळ रश्यात टाकावेत. आपल्या इच्छेनुसार रस्सा जाड किंवा पातळ करायचा ते ठरवावे आणि त्यासाठी पालका उकळलेल्या पाण्याचा वापर करावा.
 8. पनीर घातल्यावर रस्सा 2-3 मिनिटे शिजवावा. आता कसूरी मेथी व ताजी साय टाकून व्यवस्थित मिसळून घ्यावे आणि मग आच बंद करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर