बटर नान | Butter Naan Recipe in Marathi

प्रेषक Deepali Jain  |  21st Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Butter Naan by Deepali Jain at BetterButter
बटर नानby Deepali Jain
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4922

0

Video for key ingredients

 • Homemade Short Crust Pastry

बटर नान recipe

बटर नान बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter Naan Recipe in Marathi )

 • दीड वाटी मैदा
 • 1/4 वाटी सामान्य तापमानावरील आंबट दही
 • अर्धा लहान चमचा साखर
 • अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर
 • 1/4 लहान चमचा बेकिंग सोडा
 • 1 मोठा चमचा तूप
 • 1 मोठा चमचा कांद्याच्या बिया किंवा काळे जिरे
 • आवश्यकतेनुसार कोमट पाणी
 • मीठ चवीनुसार

बटर नान | How to make Butter Naan Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा एकत्र करा. मिश्रणाच्या मध्यभागी एक खळगा करा. नंतर त्यात मीठ, साखर, दही आणि तूप घालून नीट एकजीव करा. हाताने किंवा लाकडी चमच्याने मिक्स करा.
 2. त्याला थोड्या वेळासाठी तसेच राहू द्या.
 3. नंतर थोडे थोडे कोमट पाणी घालत तुमच्या बोटांनी मिश्रणाला एकत्र करा. कणिकासारखे झाले की 5-6 मिनिटे त्याला मळा. नरम कणिक बनवून त्यावर क्लिंग फिल्म लावून 4-5 तास बाजूला ठेवा.
 4. जेव्हा हे बनविण्यासाठी तयार झाले की जर तुम्ही तंदूरमध्ये बनविणार असाल, तर तंदूर अगोदर गरम करून घ्या किंवा तवा गरम करा. पीठाचे लहान लहान गोळे करा. पिठाला लहान प्लेटसारखे दाबा आणि त्यावर काळे जिरे शिंपडा.
 5. पिठाला चपातीसारखे लाटा ज्यामुळे काळे जिरे त्यावर नीट चिकटतील. आता नानच्या जिरे न लागलेल्या भागावर पेस्ट्री ब्रशने किंवा तुमच्या बोटांने थोडे पाणी लावा.
 6. नंतर वरील बाजू तव्यावर घाला आणि मध्यम आचेवर नान भाजा. याला फुलेपर्यंत भाजा. एक बाजू तव्यावर भाजली गेली की आचेवरून तवा काढून घ्या आणि नानच्या दुसऱ्या बाजूला सरळ आचेवर भाजा.
 7. जर तुम्ही तंदूर वापरत असाल तर, नानला डोमच्या झाकणावर चिकटवा आणि फुलेपर्यंत राहू द्या. नंतर झाकणावरून काढून घ्या आणि वायर रॅकवर ठेऊन दुसरी बाजू भाजा.
 8. नान भाजले गेले की लगेच लोणी लावा आणि तुमच्या आवडीच्या भाजीबरोबर गरमगरम वाढा.

My Tip:

रस्सा किंवा डाळीबरोबर खाल्ले जाणारे हे सर्वात उत्तम यीस्टरहित नान आहे.

Reviews for Butter Naan Recipe in Marathi (0)