मुख्यपृष्ठ / पाककृती / Kanchipuram Idli

Photo of Kanchipuram Idli by Nayana Palav at BetterButter
0
18
5(4)
0

Kanchipuram Idli

Dec-07-2017
Nayana Palav
960 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Kanchipuram Idli कृती बद्दल

कांचीपुरम इडली एक पारंपारिक पाककृती आहे. ही ईडली कांचीपूरम, तामीळनाडू त खूप प्रसिद्ध आहे. तेथील मंदिरात ही ईडली प्रसाद म्हणून दिली जाते. ही इतर ईडली पेक्षा खूप चवदार आहे. ही न्याहरी साठी उत्तम पर्याय आहे. चटणी, सांबार नसले तरी चालते. चला पाहू या हिची पाककृती.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • तामिळ नाडू
 • स्टीमिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. तांदूळ तीन वाटया
 2. उडीद डाळ एक वाटी
 3. थोडेसे तेल
 4. दही तीन चमचे
 5. मोहरी १/४ चमचा
 6. हिंग १/४ चमचा
 7. कढीपत्ता ८ पाने
 8. उडीद डाळ (फोडणी साठी) १/४ चमचा
 9. चणा डाळ (फोडणी साठी) १/४ चमचा
 10. हळद १/४ चमचा
 11. कोंथीबीर,
 12. चवीपुरते मीठ

सूचना

 1. प्रथम तांदूळ व उडीद डाळ धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे. 
 2. सात ते आठ तासानंतर ते मिक्सरमधुन रवाळ वाटून घ्यावे . 
 3. पीठ आंबवण्यासाठी रात्रभर झाकून ठेवावे.
 4. सकाळी या पिठात मीठ व दही घालावे.
 5. एक भांडे गॆस वर ठेवावे, त्यात तेल घालावे.
 6. हिंग, मोहरी, दोन्ही डाळी, कढीपत्ता, हळद घालून फोडणी करा.
 7. आता ही फोडणी ईडलीच्या पीठात घाला.
 8. कोंथीबीर कापून घाला.
 9. नीट मिक्स करा.
 10. नंतर इडली पात्राला तेल लावून त्यात प्रत्येक साच्यात थोडे-थोडे पीठ टाकून इडल्या कराव्यात.
 11. तयार आहेत तुमच्या स्वादिष्ट कांचीपूरम इडल्या.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
atul chikane
Dec-11-2017
atul chikane   Dec-11-2017

Mastach :ok_hand:

Vaishali Ingole
Dec-08-2017
Vaishali Ingole   Dec-08-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर