BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Bajani che thalipith

Photo of Bajani che thalipith by Rohini Rathi at BetterButter
294
10
5(2)
0

Bajani che thalipith

Dec-08-2017
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप भाजणीचे पीठ
  2. एक कप पाणी
  3. चवीपुरते मिठ
  4. एक टीस्पून लाल तिखट
  5. अर्धा टी स्पून जीरा
  6. १/४ टिस्पून हळद
  7. २ चिमूट हिंग
  8. 1 टी स्पून तेल
  9. एक कप बारीक चिरलेला कांदा
  10. १/४ कप चिरलेली कोथिंबीर
  11. अर्धा कप तेल थालीपीठ भाजताना तव्यावर सोडण्यासाठी

सूचना

  1. प्रथम भाजणीची उकड काढून घ्यावी त्यासाठी
  2. १ कप पाणी नॉनस्टिक भांड्यात उकळवण्यास ठेवावे. त्यात तिखट, मिठ, हिंग, हळद, जिरे, १ टेस्पून तेल घालून मिक्स करावे. पाणी उकळले कि गॅस मंद करून पाण्यात भाजणी घालावी आणि लगेच चमच्याने ढवळावे.
  3. थोडे मिक्स करून वरती झाकण ठेवून ५ मिनीटे मंद आचेवर वाफ काढावी. गॅस बंद करून वाफ अजून ५ मिनीटे मुरू द्यावे.
  4. उकड थोडी कोमट झाली कि पाण्याचा हात लावून मळून घ्यावे. मळतानाच चिरलेला कांदा आणि कोथिंबीर त्यात घालून एकत्र करावे.
  5. थोडावेळ झाकून ठेवावे.
  6. नंतर ४ ते ५ मध्यम आकाराचे सारखे गोळे करून घ्या
  7. जाडसर प्लास्टिकचा तुकडा घ्यावा (२ फुट x १ फुट). लांबड्या बाजूकडून बरोबर अर्धा असा दुमडून घ्यावा. त्याला अगदी थोडा पाण्याचा हात लावावा. मधे १ भाजणीचा गोळा ठेवून वरती अर्धा प्लास्टीकच्या भागाने कव्हर करून लाटावे. .
  8. कडेला जर भेगा पडत असतील तर बोटांनी जरा आत ढकलून सारख्या करून घ्याव्यात. मध्यम लाटावे
  9. तवा गरम करून तेल घालून त्यावर थालिपीठ घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यावे. (प्रत्येक बाजू साधारण २ ते ३ मिनीटे)
  10. फक्त दह्याबरोबर किंवा दही-मिरची लोणच्याबरोबर आणि कैरी लोणच्याबरोबर थालिपीठ अप्रतिम लागते.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Nice one.

Nayana Palav
Dec-08-2017
Nayana Palav   Dec-08-2017

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर