ढोकळा | Dhokla Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  8th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dhokla by Rohini Rathi at BetterButter
ढोकळाby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

23

0

ढोकळा recipe

ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhokla Recipe in Marathi )

 • एक कप बेसन
 • दोन चमचे रवा
 • एक कप ताक
 • एक चमचा लिंबाचा रस
 • एक लहान चमचा साखर
 • दोन चमचे पाणी
 • एक लहान चमचा हळद
 • दोन लहान चमचे ईनो 
 • एक चमचा तेल
 • मीठ चवीपुरते
 • फोडणीसाठी
 • एक चमचा तेल
 • आता चमचा मोहरी
 • दोन हिरवी मिरची बारीक चिरून
 • अर्धा लहान चमचा हिंग
 • कढीपत्त्याची पाने चारपाच
 • तीळ एक चमचा

ढोकळा | How to make Dhokla Recipe in Marathi

 1. एक कप बेसन पीठ एक चमचा रवा दोन लहान चमचे साखर अर्धा चमचा हळद एक चमचा लिंबाचा रस एक चमचा तेल चवीपुरते मीठ हे सर्व साहित्य आणि एक ते सव्वा कप ताक एकत्र करावे
 2. वरील सर्व मिश्रण एका भांड्यात घेऊन मिश्रण तयार करावे
 3. ईनो  घालून एकाच दिशेने पंधरा ते वीस सेकंद ढवळावे
 4. मिश्रण थोडे फसफसायला लागते लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून पाणी उकळत ठेवलेल्या पॅनमध्ये ठेवावे वरून पंचा लावलेले झाकण ठेवावे
 5. मिश्रण मध्यम आचेवर पंधरा ते अठरा मिनिटे वाफ काढावी वाफ काढताना झाकण अजिबात उचलू नये यासाठी अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी ठेवावे पाणी कमी पडले आणि संपूर्ण पाणी संपले तर ढोकळा ता तळाला चिकटून करपू शकतो
 6. फोडणीसाठी लहानशा कढल्यात किंवा लोखंडी पळीत एक ते दोन चमचे तेल गरम करावे त्यात मोहोरी, एक चमचा तीळ, कढीपत्ता चार-पाच पाने, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लहान हिंग घालून फोडणी तयार करावी
 7. पंधरा मिनिटांनी गॅस बंद करावा एक दोन मिनिटांनी भांडे बाहेर काढावे ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी
 8. अशाप्रकारे फुललेला ढोकळा तयार झाला
 9. हा ढोकळा हिरव्या तिखट चटणी बरोबर झकास लागतो

My Tip:

ताका ऐवजी दही घालू शकता

Reviews for Dhokla Recipe in Marathi (0)