मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची भाकरी

Photo of Methi chi bakari by Rohini Rathi at BetterButter
960
20
0.0(0)
0

मेथीची भाकरी

Dec-08-2017
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची भाकरी कृती बद्दल

मेथीची भाकरी ही एक गुजराती पाककृती आहे गुजरातमध्ये याला मेथी ना ठेपला असे म्हणतात. ही भाकरी न्याहारीसाठी फारच पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप बारीक चिरलेली मेथी
  2. एक कप बाजरीचे पीठ
  3. अर्धा कप मक्याचे पीठ
  4. मीठ चवीपुरते
  5. वाटलेली हिरवी मिरची दोन चमचे
  6. वाटलेला लसूण छोटा एक चमचा
  7. तेल एक चमचा
  8. पाणी अर्धा कप
  9. तेल भाकरी भाजण्यासाठी
  10. तीळ एक चमचा

सूचना

  1. प्रथम बारीक चिरलेली मेथी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी
  2. धुतलेली मेथी एका ताटात घेऊन त्यात बाजरीचे पीठ घालावे
  3. नंतर हिरवी मिरचीची पेस्ट लसूण पेस्ट मीठ तेल तीळ घालून मिश्रण एकजीव करावे
  4. आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे
  5. मळलेल्या पिठातून छोटा गोळा घेऊन भाकरी लाटावी
  6. भाकरी तव्यावर मंद आचेवर भाजावी
  7. भाकरीला दोन्ही बाजूने तेल लावून खमंग भाजावी
  8. अशाप्रकारे गरम गरम भाकरी लोणचे आणि दही बरोबर खावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर