व्हेजिटेबल मनचाऊ सूप | Vegetable Manchow Soup Recipe in Marathi

प्रेषक Jyothi Rajesh  |  22nd Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Vegetable Manchow Soup by Jyothi Rajesh at BetterButter
व्हेजिटेबल मनचाऊ सूप by Jyothi Rajesh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3142

0

व्हेजिटेबल मनचाऊ सूप recipe

व्हेजिटेबल मनचाऊ सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetable Manchow Soup Recipe in Marathi )

 • 2 गाजर
 • 10 हिरव्या फरसबी
 • 25 ग्रॅम्स (1/4 वाटी) कोबी
 • 25 ग्रॅम्स (1/4 वाटी) पांढऱ्या कांद्याची पात
 • 1 मोठा चमचा आले
 • 1 मोठा चमचा लसूण
 • 1 मोठा चमचा डार्क सोया सॉस
 • 1 लहान चमचा व्हिनेगर
 • मीठ स्वादानुसार
 • 1 मोठा चमचा मिरपूड
 • 1 मोठा चमचा तिळाचे तेल
 • 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोर
 • 1/4 कप पाणी + अतिरिक्त
 • सजविण्यासाठी हिरवी कांद्याची पात
 • अर्धी वाटी तळलेले नुडल्स

व्हेजिटेबल मनचाऊ सूप | How to make Vegetable Manchow Soup Recipe in Marathi

 1. सर्व भाज्या धुवा (आले, लसूण, गाजर, फरसबी, कोबी) आणि कांद्यासह अतिशय बारीक चिरा.
 2. एका कढईत तेल गरम करा. गरम तेलात आले, लसूण आणि कांदा घाला. कांदा गुलाबी होईपर्यंत तळा.
 3. नंतर त्यात बारीक चिरलेल्या भाज्या, मीठ आणि मिरपूड घाला. 3 ते 4 मिनिटे मोठ्या आचेवर शिजवा.
 4. नंतर सोया सॉस आणि विनेगर घाला. एकजीव होईपर्यंत मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि एक उकळी येऊ द्या.
 5. कॉर्नफ्लोर पाण्यात घाला आणि गाठी होणार नाहीत अशा प्रकारे मिसळून घ्या. एकसारखे हलवीत ते मिश्रण सूपमध्ये ओता. आणखीन 3 ते 5 मिनिटे हळू हळू उकळवा आणि शिजवा.
 6. पॅकेटवर दिलेल्या निर्देशानुसार नुडल्स पाण्यात शिजवा आणि गाळून घ्या. गरम तेलात नुडल्स कुरकुरीत होईपर्यंत तळा. तेलातून काढून घ्या आणि अतिरिक्त तेल काढण्यासाठी एका पेपर टॉवेलवर ठेवा.
 7. सूप तयार झाले की स्वादानुसार मसाले घाला आणि गॅस बंद करा.
 8. वाढण्याच्या वाडग्यात सूप ओता, त्यावर तळलेले नुडल्स आणि हिरव्या कांद्याची पात घालून त्वरित वाढा.

My Tip:

या गरम आणि चविष्ट सूपमध्ये कुरकुरीत असे नूडल्स टाकल्यास हा व्हेजिटेबल मनचाऊ सूप आणखी मजेदार बनेल.

Reviews for Vegetable Manchow Soup Recipe in Marathi (0)